22.2 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeKhedदसरा-दिवाळी निमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे सेवा

दसरा-दिवाळी निमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे सेवा

१७ ऑक्टोबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान या रेल्वे चालवल्या जाणार आहेत.

कोकणात आगामी दसरा सणानंतर दिवाळीपासून पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. हा सण व सुट्यांचा कालावधी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी अशी विशेष साप्ताहिक विशेष सेवा सुरू केली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरती प्रशासनाकडून अनेकदा गाड्या सोडण्यात आल्या होत्या या सगळ्या गाड्यांनाही प्रवाशांचा उदंड असा असा प्रतिसाद मिळाला. दसरा, दिवाळी सणाच्या दरम्यान येणाऱ्या सुट्ट्या पर्यटनाचा सुरू होणारा हंगाम याच दरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाकडून ही साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा गाडी सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १७ ऑक्टोबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान या विशेष साप्ताहिक रेल्वे सेवेच्या आठ फेऱ्या चालवल्याजाणार आहेत. यामुळे मुंबई परिसरातून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड या दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा गाडी चालवली जाणार आहे.

०११७९ ही विशेष साप्ताहिक गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७, २४, ३१ ऑक्टोबर तसेच ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दर शुक्रवारी सकाळी ०८.२० वाजता सुटणार आहे व त्याच दिवशी रात्री २१.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीच्या मार्गासाठी ०११८० हीङ्गगाडी सावंतवाडी रोड येथून १७, २४, २१ ऑक्टोबर आणि ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रत्येक शुक्रवारी रात्री २२.२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येईल. ही विशेष रेल्वे सेवा गाडी कोकणातील पुढील स्थानकांवर होणार आहे. ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे. गाडीच्या रचनेत १ एसी फर्स्ट क्लास, ३ एसी-२ टियर, ७ एसी ३-टियर, ८ स्लीपर क्लास, १ पॅन्ट्री, कार आणि २ जनरेटर व्हॅन यांचा समावेश असेल, या साप्ताहिक रेल्वेगाडीला पर्यटकांचा प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळण्याची शकता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular