25.8 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriधूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचा वेग वाढवा - मंत्री उदय सामंत

धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचा वेग वाढवा – मंत्री उदय सामंत

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे साडेतीन किमीचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे.

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या राहिलेल्या सुमारे १२०० मीटर बंधाऱ्याचे काम वेगाने करा. पावसापूर्वी काम पूर्ण करायचे आहे. त्यामुळे मशीन व इतर यंत्रणा वाढवा, अशी कडक सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठेकेदार कंपनीला दिली. रत्नागिरी दौऱ्यावर असताना आज दुपारी मंत्री उदय सामंत यांनी मिऱ्या बंधाऱ्याला भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी ठेकेदार पवार, पत्तन विभागाचे अभियंता सिसोदे, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आदी उपस्थित होते. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे साडेतीन किमीचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. यापैकी बाराशे मीटरचे काम अजून अपूर्ण आहे. पत्तन विभागाने केलेल्या सव्र्व्हेमधील सात डेंजरझोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे; परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे. या टप्प्याचे काम करताना यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या जागेवरून वाद निर्माण झाला.

जागामालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. हे काम व्हावे यासाठी स्थानिकांनी पत्तन विभागाला निवेदनही दिले. पावसाळ्यापूर्वी हे काम व्हावे, असे स्थानिकांचे मत आहे. त्यानंतर याबाबत पत्तन विभागाने ठेकेदाराची बैठक घेऊन त्याला काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. आदेशानंतरही काही दिवसांपूर्वीच ठेकेदाराने बंधाऱ्याचे काम सुरू केले; परंतु ते कासवाच्या गतीने सुरू होते. कमी यंत्रणा आणि मशिनद्वारे बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केली आहे. याबाबत पतन विभागाने ठेकेदाराला सूचना देऊनही त्यामध्ये सुधारणा झाली नव्हती. आज मंत्री उदय सामंत यांनी बंधाऱ्याच्य कामाची पाहणी केली. पावसापूर्वी काम पूर्ण करायचे आहे. कामाचा वेग वाढवा आणि मशिनरी देखील वाढवा तरच ते शक्य आहे, अशी सूचना केली.

RELATED ARTICLES

Most Popular