25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeChiplunचिपळूण बसस्थानकाच्या कामास गती

चिपळूण बसस्थानकाच्या कामास गती

६ वर्षे उलटली तरी या इमारतीचा पायादेखील उभा राहिला नाही. 

रत्नागिरी, लांजा व चिपळूण या हायटेक बसस्थानकाचे एकाचवेळी काम हाती घेण्यात आले; मात्र गेल्या सहा वर्षे या ना त्या कारणाने ही कामे रखडली आहेत. यातील चिपळूण बसस्थानकाचे काम पुन्हा एकदा सुरू झाले असून, या कामाला आता वेग आला आहे. सातारा येथील ठेकेदारामार्फत हे काम सुरू असून गणेशोत्सावनंतर या कामाचा वेग आणखी वाढवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा आणि चिपळूण या तीन बसस्थानकांचे काम एकाचवेळी २०१७ मध्ये सुरू झाले. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी या कामांचे धुमधडाक्यात भूमिपूजन केले होते; मात्र त्यानंतर आलेल्या पालकमंत्री व परिवहनमंत्री अनिल परब यांनी या कामाकडे पुरते दुर्लक्ष केले. या हायटेक पद्धतीच्या बसस्थानकासाठी रत्नागिरीला १० कोटी, चिपळूणला ३ कोटी ८० लाख तर लांजासाठी १ कोटी ५० लाखांचा खर्च येणार आहे.

रत्नागिरीसाठी आणखी कोट्यवधीचा निधी पालकमंत्री सामंत यांनी मिळवून दिला; मात्र वाढीव निधी अभावी चिपळुणातील हायटेक बसस्थानकाचे काम अडचणीत आले. चिपळूण बसस्थानकाच्या कोटी, चिपळूणला ३ कोटी ८० लाख तर लांजासाठी १ कोटी ५० लाखांचा खर्च येणार आहे. रत्नागिरीसाठी आणखी कोट्यवधीचा निधी पालकमंत्री सामंत यांनी मिळवून दिला; मात्र वाढीव निधी अभावी चिपळुणातील हायटेक बसस्थानकाचे काम अडचणीत आले. चिपळूण बसस्थानकाच्या बांधकामाबाबत गेल्या पाच वर्षापासून प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. प्रत्यक्षात रत्नागिरी बसस्थानकाचे काम ३६ महिन्यांत, तर लांजा व चिपळुणातील काम २४ महिन्यात होणे अपेक्षित होते; मात्र ६ वर्षे उलटली तरी या इमारतीचा पायादेखील उभा राहिला नाही.

पायाभरणीच्या बांधकामाचे लोखंडही गंजून गेले. मुंबई-गोवा महामार्गादरम्यान चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक केंद्रस्थानी आहे. या ठिकाणी २४ तास एसटीची सेवा सुरू असते. कार्यशाळादेखील २४ तास सुरू असते; मात्र स्थानकाची इमारत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पूर्वी जुनी इमारत बरी होती, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे या इमारतीचे बांधकाम सुरू होण्यासाठी अनेकांनी आंदोलने देखील केली. अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular