29.7 C
Ratnagiri
Sunday, June 16, 2024

इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, १८० कुटुंबांना नोटिसा

तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना...

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच...

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार...
HomeChiplunजलजीवन मिशनमध्येही घोळ, टेरव पाणीयोजना

जलजीवन मिशनमध्येही घोळ, टेरव पाणीयोजना

मुल्यांकनात सुमारे ५७५ मीटर खोदाई झाल्याचे तसेच ८ किलोमीटर पाईप पसरल्याचे नमूद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता.

टेरव येथे जलजीवन मिशन योजनेतून राबवण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेची दापोलीतील चौकशी अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबींची पाहणी केली. पाणी योजनेसाठी ५५० मीटर खोदाई करून पाईपलाईन टाकल्याचे मुल्यांकनात नमूद केले होते; मात्र प्रत्यक्षात ६० मीटर लांब खोदाई झाल्याचे उघड झाले आहे. या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येणार असून जे वास्तव आहे, तेच अहवालात नमूद करणार असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दापोली येथील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. बुटाला व एस. एन. आनंदे यांनी टेरवच्या जलजीवन मिशन योजनेतील पाणीपुरवठा योजनेची बुधवारी चौकशी केला.

सकाळी ११च्या सुमारास टेरव ग्रामपंचायतीत तक्रारदार ग्रामस्थ व चिपळूण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चौकशी कशी णार, याचे स्पष्टीकरण देण्यात वाले. त्यानंतर चौकशी अधिकारी व कारदारांनी तळेवाडी येथे ठेवलेल्या पलाईन साठ्याची पाहणी केली त्याचबरोबर पाणीयोजनेतील साठवण टाकीचीही पाहणी करण्यात आली. देव गावासाठी अरे येऊन पाणी उचलले जाणार आहे. त्यामुळे पाणीयोजनेच्या उद्भव विहिरीपासून टाकलेल्या पाईपलाईनवर ग्रामस्थांचा आक्षेप होता. मुल्यांकनात सुमारे ५७५ मीटर खोदाई झाल्याचे तसेच ८ किलोमीटर पाईप पसरल्याचे नमूद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. प्रत्यक्षात मोजणीदरम्यान ६० मीटरची खोदाई करून पाईपलाईन टाकल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर पाणीयोजनेतील साठवण टाकीचीही पाहणी करण्यात आली.

देव गावासाठी अरे येऊन पाणी उचलले जाणार आहे. त्यामुळे पाणीयोजनेच्या उद्भव विहिरीपासून टाकलेल्या पाईपलाईनवर ग्रामस्थांचा आक्षेप होता. मुल्यांकनात सुमारे ५७५ मीटर खोदाई झाल्याचे तसेच ८ किलोमीटर पाईप पसरल्याचे नमूद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. प्रत्यक्षात मोजणीदरम्यान ६० मीटरची खोदाई करून पाईपलाईन टाकल्याचे निदर्शनास आले. या वेळी झालेल्या चर्चेत अधिकारी व तक्रारदारांमध्ये घमासान झाल्याचे दिसून आले. या झालेल्या पाहणीतील माहिती सांगण्यास नकार दिला. पाहणीदरम्यान जे वास्तव आहे तेच अहवालात नमूद करणार असून काहीही लपवणार नसल्याचे स्पष्ट केले.

या वेळी ग्रामपंचायत कारभाराच्या झालेल्या चौकशीत गटविकास अधिकाऱ्यांनी ताशेरे ओढून कामात अनियमितता झाल्याचे स्पष्ट केले होते.. त्यानुसार कार्यवाही प्रक्रिया सुरू आहे. त्यातच आता जलजीवन मिशनमध्येही पाणी मुरल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला असून, त्यातील काही बाब उघड झाल्या आहेत. पाहणीदरम्यान चिपळूण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अविनाश जाधव, शाखा अभियंता गवस, ग्रामविकास अधिकारी माने यांच्यासह तक्रारदार एकनाथ माळी, कृष्णा कुंभार, राजेंद्र म्हालीम, सोमा म्हालीम, रमेश म्हालीम, रामचंद्र पंडव, जयराम म्हालीम, बारकू मोरे, परशुराम फागे, अनंत कराडकर, रमेश माळी, विजय तांदळे, शशिकांत कान्हेरे, रामचंद्र शिरकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular