26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriक्रीडा संघटनांनी बुधवारपर्यंत कागदपत्रे द्या - जिल्हा क्रीडा अधिकारी

क्रीडा संघटनांनी बुधवारपर्यंत कागदपत्रे द्या – जिल्हा क्रीडा अधिकारी

या खेळ प्रकारांना पाच टक्के खेळाडू आरक्षण, क्रीडा गुण सवलत, शिष्यवृत्ती, रोख पारितोषिके या योजनांचा लाभ असणार नाही.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने समाविष्ट झालेल्या विनाअनुदानित शालेय क्रीडास्पर्धांचे आयोजन करावयाचे आहे. क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असलेले संघटनेचे नोंदणी प्रमाणपत्र आदी माहिती ८ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी यांनी केले आहे.

कागदपत्रांमध्ये संघटनेचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमा व ई-मेल आयडी, अध्यक्ष व सचिव यांचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, महाराष्ट्र राज्य संघटनेचे संलग्नता प्रमाणपत्र, पंच परीक्षा उत्तीर्ण असलेल्या पंचाची यादी, स्पर्धा आयोजन संघटना स्वतःच्या जबाबदारीवर तसेच संघटनेच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने करणार असल्याचे हमीपत्र ही कागदपत्रे ८ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यलयात सादर करावीत, असे सांगण्यात आले.

या खेळ प्रकारांना पाच टक्के खेळाडू आरक्षण, क्रीडा गुण सवलत, शिष्यवृत्ती, रोख पारितोषिके या योजनांचा लाभ असणार नाही. या खेळांमध्ये आष्टे डु आखाडा, युनिफाईट, मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, स्पीडबॉल, तेंग सु डो, फील्ड आर्चरी, कुडो, मिनी गोल्फ, सुपर सेव्हन किक्रेट बेल्ट रेसलिंग, थायबॉक्सिंग, फ्लोअरबॉल, हाफ किडो बॉक्सिंग, रोप स्किपिंग, कुराश, टेबल सॉकर, हुए कॉन दो, अॅपलिंग, जित कुलेदो, मार्शल आर्ट, युग-मुंदो, रस्सीखेच, वुडबॉल, टेनिस क्रिकेट, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, आदींचा समावेश आहे. संघटनेच्या या खेळांच्या जिल्हास्तर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular