27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeMaharashtraगर्दीच्या ठिकाणी स्वसुरक्षिततेसाठी जनतेमध्ये जनजागृती करावी – मुख्यमंत्री

गर्दीच्या ठिकाणी स्वसुरक्षिततेसाठी जनतेमध्ये जनजागृती करावी – मुख्यमंत्री

कोरोनाची वाढती संख्या पाहता कोविड टास्क फोर्सनं सभागृहे, मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, अशा गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं राज्यात पुन्हा मास्कसक्ती  करावी अशी मागणी सर्व जिल्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गर्दीच्या ठिकाणी राज्यात मास्क सक्ती करण्याचा विचार असून आज मुख्यमंत्र्याच्या बैठकीत त्यावर निर्णय होणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना  दिली आहे.

राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांसदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पुन्हा मास्कच्या वापराबद्दल विषयावर चर्चा झाली. दरम्यान नागरिकांमध्ये स्वसुरक्षिततेसाठी मास्क लावण्या संदर्भात जास्तीत जास्त विविध मार्गाने जनजागृती करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्य सरकारने मराठी नववर्ष गुढी पाडव्याचा मुहुर्त साधून महाराष्ट्र मास्क मुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र कोरोनाची वाढती संख्या पाहता कोविड टास्क फोर्सनं सभागृहे, मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, अशा गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत सध्या राज्यात धोका काही नसल्याने कोरोन निर्बंधित लसीकरण आणि कोरोना टेस्ट वाढवण्यावर अधिकच भर द्यावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यावर सक्ती करण्याचा सरकारचा विचार असल्याचं सांगितलं आहे. टोपे पुढे म्हणाले की, लसीकरण करण्यात आपण खूपच पुढे आहोत. सध्या १२ ते १८ वयोगटासाठी लसीकरण सुरु आहे आणि आत्ता ६ ते १२ वयोगटासाठी नव्याने लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमावली आली की लगेचच लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

तसेच महाराष्ट्रात सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. आपलं राज्य सेफ झोनमध्ये आहे. आज ९२९  ॲक्टिव्ह केसेस आहेत. मिलियनमध्ये आपण खूपच कमी अहोत. दर लाखामागे राज्यात केवळ ७ केसेस आहेत. त्यामुळे कोरोना टेस्टिंग वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासोबतच ट्रॅकिंग सुद्धा आम्ही ठेवत आहोत.

RELATED ARTICLES

Most Popular