22.4 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriनिवळी येथील कॅश्यू दुकानावर चोरट्यांचा डल्ला, लाखोंचे नुकसान

निवळी येथील कॅश्यू दुकानावर चोरट्यांचा डल्ला, लाखोंचे नुकसान

चोरट्याने सुमारे २ लाख रुपयांची काजुगराची २८६ पाकिटे लांबविली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेती, फळ यांचे उत्पन्न भरभरून येते. अर्थात त्यामागे शेतकरी आणि व्यावसायिकांची मेहनत सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आंबा, नारळ, काजू, चिकू हि फळे प्रत्येक मोसमामध्ये भरघोस उत्पन्न देतात. सध्या आंबा आणि काजूचा हंगाम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरु आहे. काजूचे दर सुद्धा या हंगामांत आंब्याला टक्कर देणारे आहेत. परंतु, ऐन हंगामामध्ये चोरट्यांनी कॅश्यू दुकानावर घातलेल्या डल्ल्याने दुकानदार हवालदिल झाले आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील दळवी कॅश्यू दुकानाचे छप्पर फोडून चोरट्याने सुमारे २ लाख रुपयांची काजुगराची २८६ पाकिटे लांबविली आहेत. सध्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी केलेल्या आवाहनांमुळे दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे दुकानात असलेल्या सिसिटीव्ही मध्ये चोरटा कैद झाला असून ग्रामीण पोलीस त्याचा माग घेत आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी ६ ते मंगळवार सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याबाबत संदेश परशुराम दळवी वय ४९, रा.आरोग्यमंदिर, रत्नागिरी यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चोरीची तक्रार दिली आहे.

दळवी यांचे निवळी येथे कॅश्यू विक्रीचे दुकान आहे. कोकणामध्ये काजुगराचा दर आणि चव एक नंबरच मिळते. त्यामध्ये सुद्धा ओले आणि सुके काजूगर हे मुख्य प्रकार आणि त्यामध्ये सुद्धा खारे, तिखट असे वेगवेगळ्या फ्लेवरचे काजूगर मिळू लागले आहेत. अज्ञात चोरट्याने शक्कल लढवून दुकानात प्रवेश केला. त्याने दुकानाच्या डाव्या बाजूच्या जांभ्या दगडाच्या भिंतीच्या छप्पराच्या खालील दगड फोडला आणि त्यातून त्याने दुकानात प्रवेश केला. पैशाऐवजी त्याने काजुगरांची १ लाख ९९  हजार ७००  रुपयांची वेगवेगळ्या वजनाची २८६  पाकिटे लंपास केली आहेत. त्यामुळे दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular