22.9 C
Ratnagiri
Tuesday, February 17, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeRatnagiriएसटी बँक कर्मचारी संपावर

एसटी बँक कर्मचारी संपावर

कालपासून संप सुरू झाल्यामुळे पगार बँकेतून काढणे कठीण झाले.

एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्स्पोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेतील नवीन सत्ताधारी आल्यानंतर बदललेल्या धोरणामुळे राज्यातील एसटी बँकेतील कर्मचाऱ्यांनी संप कालपासून सुरू केला आहे. मात्र त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पगार काढता आलेला नाही. एटीएम सुविधा सुरू झाली असली तरी अजूनही अनेकांनी एटीएम कार्ड घेतले नसल्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जूनमध्ये एसटी बँकेच्या निवडणुकीत अॅड. गुणरत्न सदावतें यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने सर्व १९ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी एसटी बँकेतील जुन्या धोरणांत बदल करण्याचे ठरवले. यानुसार बँकेत कार्यरत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचारी भरती करण्याचे ठरवले.

तसेच सर्व सभा ऑनलाईन घेण्यास सुरुवात केली. बँकेचे पदसिद्ध अध्यक्ष एसटीचे महाव्यवस्थापक असतात; परंतु त्यांनी व अन्य एक अधिकारी या ऑनलाइन बैठकीस उपस्थित राहिलेले नाहीत. एसटी बँकेच्या ५० शाखा राज्यभरात सुरू आहेत. यात लिपिक, शिपाई वगैर मिळून ६०० कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी संपावर गेल्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार मिळणे कठीण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एसटी बँक आहे. उर्वरित ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार स्टेट बँकेमध्ये जमा होतो. या कर्मचाऱ्यांना पगार मिळताना अडचण आलेली नाही; परंतु रत्नागिरी, चिपळूण व कणकवली येथील कर्मचाऱ्यांना ७ ऑगस्टनंतर पगार प्राप्त झालेला नाही, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कालपासून संप सुरू झाल्यामुळे पगार बँकेतून काढणे कठीण झाले. तसेच काही कर्मचाऱ्यांकडे एटीएम कार्ड आहेत; परंतु ही एटीएम कार्ड काम करत नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार झालेला आहे. संपाबाबत कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही; परंतु कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यास त्यांना महामंडळाकडून रोख स्वरूपात पगार देण्याकरिता पावले उचलली जातील. या संदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular