22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraएसटी महामंडळाचा अखेर कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय

एसटी महामंडळाचा अखेर कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय

एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना यासाठी मदत मागितली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा अडीच महिन्यापासून सुरू असलेला संप अद्यापही संपुष्टात आला नसून, आता महामंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी महामंडळाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पुन्हा एकदा एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना यासाठी मदत मागितली आहे. महामंडळाने त्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार वय ६२ वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक असल्याचे महामंडळाने जाहिरातीमध्ये म्हटले आहे. करार पद्धतीवर नेमणूक होणाऱ्या चालकांना दरमहा २६ हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले,  त्या विभागांमध्ये करारपद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकतात. एसटी महामंडळाने येत्या तीन दिवसांमध्ये अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. सोबत एसटी महामंडळाने एक इच्छुक उमेदवारांसाठी एक अट सुद्धा ठेवली आहे, ती म्हणजे, महामंडळाच्या सेवेत असताना अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघाताची नोंद नसणे,  शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त केलेला नसावा.

एसटीतील सेवानिवृत्तांसह एसटी महामंडळाने इतरही कंत्राटी चालकांची नेमणूक करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. करार पद्धतीने चालक भरती करून मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून घेण्यासाठीचे अर्ज मागितले आहेत. फक्त त्या कंत्राटी चालकाकडे अवजड वाहन चालवण्याचा किमान एक वर्षाचा वाहतुकीचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय संबंधित उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना व पीएसव्ही बॅच असणे बंधनकारक आहे.

एसटी महामंडळातील तब्बल ५५  हजार संपकरी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत एसटी महामंडळातील तब्बल ११४३ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. तर ११ हजारच्या दरम्यान  कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या ५५ हजार कर्मचाऱ्यांना संप काळातील पगार मिळणार नसल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular