27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraएसटी संप, पुढची सुनावणी आता २० डिसेंबरला

एसटी संप, पुढची सुनावणी आता २० डिसेंबरला

राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात काल सुनावणी पार पडली. त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याचं स्पष्ट झालं असून यावरची पुढची सुनावणी आता २० डिसेंबरला होणार आहे. राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतूनही काही निष्पन्न झालं नसल्याने हा संप आता पुढचा महिनाभर सुरु राहतोय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. कर्मचार्यांनी मात्र मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये संप मागे घेणार नसल्याचे निक्षून सांगितले आहे.

एसटी संपाबाबत आज न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी कोरोनाकाळापासून बंद ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक संस्था आता कुठे सुरू होत आहेत. मग यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काय करायचं असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. एसटी कामगारांनी संप सुरू ठेवताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतंय याचाही विचार करणे गरजेच आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

संपकाळात कामावर येऊ इच्छिणा-या कामगारांना संपकऱ्यांनी आडकाठी केली जात आहे असं राज्य सरकारने न्यायालयात सांगितलं. मात्र अशी कोणतीही घटना घडलेली नाही असे सांगून, संपकरी कामगार संघटनेनं नाकारलं आहे. आता यावर पुढच्या महिन्यात, २० डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

सिंधुदूर्गमध्ये बोलताना नारायण राणे यांनी म्हटले की,  एसटीचा विषय महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतमध्ये येतो. एसटीचा संप पंधरा दिवस सुरूच आहे. कोरोना काळापासून  जवळपास ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी अतिशय भयावह परिस्थिती आहे. असं असताना राज्य सरकार त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष का करत आहे? असे राणे यांनी विचारले.

RELATED ARTICLES

Most Popular