25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriऑनलाइन आरक्षणानंतरही एसटी प्रवाशांना त्रास

ऑनलाइन आरक्षणानंतरही एसटी प्रवाशांना त्रास

ब्रेक डाऊनमुळे रत्नागिरीतून कोल्हापूरला एसटी बस न गेल्यामुळे ही वेळ आली.

दोन दिवसांपूर्वी ऑनलाइन आरक्षण करूनही कोल्हापूर येथून रत्नागिरीत जाणारी एसटी बस नसल्याने दहा ते पंधरा प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. एसटीच्या वर्धापनदिनीच प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल प्रवाशांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर दुसऱ्या गाडीतून प्रवास करण्याची वेळ या प्रवाशांवर आली. ब्रेक डाऊनमुळे रत्नागिरीतून कोल्हापूरला एसटी बस न गेल्यामुळे ही वेळ आली. याबद्दल अधिकाऱ्यांनीही खंत व्यक्त केली व दुसऱ्या गाडीतून व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.

याबाबत प्रवाशांनी सांगितलेल्या माहितीनुसार कोल्हापूर एसटी बसस्थानकातून शनिवारी दुपारी ३.३० वाजता रत्नागिरीत जाणारी बस सुटते. त्यानुसार ऑनलाइन आरक्षण प्रवाशांनी दोन दिवसांपासून केले होते. यामध्ये काही महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांचाही समावेश होता. काही नोकरदार, सुट्टीसाठी कोल्हापूर व परिसरात फिरायला गेलेले काही नागरिकही यामध्ये होते. दुपारी ३ वाजता यातील काही प्रवासी आले असता बस सुटणार नसल्याची माहिती कळली. त्यानंतर प्रवाशांनी रत्नागिरी एसटी बसस्थानक, तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधायला सुरवात केली. त्यावेळी ब्रेक डाऊनमुळे रत्नागिरीतून सुटणारी बस सुटू शकली नाही. त्यामुळे तिथून कोल्हापूर- रत्नागिरी ही रत्नागिरी आगाराची बस ३.३० वाजता सुटणार नसल्याचे समजले.

रत्नागिरीतील एसटी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र बस सोडणे शक्य नसून तिथून येणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये आपली व्यवस्था करतो, असे सांगितले. परंतु ऑनलाइन आरक्षणात मिळालेले आसन क्रमांक मिळणार नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही ब्रेक डाऊनचे कारण सांगितले. ऑनलाइन आरक्षणला चांगली मागणी असूनही बस सुटू न शकल्याने एसटीने सेवेत सुधारणा करणे आवश्यक असल्याचे यातील काही प्रवाशांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular