25.7 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraसंपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा जमाव सिल्वरओकवर, शरद पवार आणि सरकारविरोधात जोरदार घोषणा

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा जमाव सिल्वरओकवर, शरद पवार आणि सरकारविरोधात जोरदार घोषणा

संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग होता. त्यानी आपल्या हातातील बांगड्या खणखणवून सरकार विरोधात निषेध आणि राग व्यक्त केला.

मागील साधारण पाच महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपले असे वाटत असताना आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आज शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थाना बाहेर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पलफेक करण्यात आली. तसेच, शरद पवार आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. अचानकपणे झालेल्या या आंदोलनासमोर पोलिसांची त्रेधातीरपिट उडाली ते देखील एवढ्या जमावासमोर हतबल झालेले पहायला मिळाले.

यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक केली. यावेळी निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु, एवढ्या शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागणे कठीणच बनले होते. आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौज फाटा सिल्वर ओकमध्ये दाखल झाला आहे. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग होता. त्यानी आपल्या हातातील बांगड्या खणखणवून सरकार विरोधात निषेध आणि राग व्यक्त केला.

आज संपकरी कर्मचारी अतिशय आक्रमक झालेले दिसून आले आहेत. मोठ्या संख्येने आलेल्या कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे बाहेर आल्या. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी बोलण्यास तयार असल्याचे प्रतिक्रिया दिली. परंतु पुढे त्या म्हणाल्या की,  सर्वांनी शांत राहावे. कुणीही दगडफेक आणि चप्पलफेक करू नये. माझे आई-वडील आणि मुलगी घरामध्ये आहेत, त्यांच्या सुरक्षेची हमी मिळाली तरच मी पुढे येऊन बोलेन. त्यांची सुरक्षा माझ्यासाठी महत्वाची आहे. मी सर्वांचे म्हणने ऐकायला तयार आहे, फक्त त्यांनी शांत रहावे असे त्यांनी आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular