27.1 C
Ratnagiri
Thursday, November 14, 2024

मुंबईत जोरदार राडा, तुफान दगडफेक शिंदे X ठाकरेंचे शिवसैनिक भिडले !

निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच मुंबईत मंगळवारी रात्री...

परशुराम घाटातील वाहतूक धोक्याचीच…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना परशुराम घाट...
HomeRatnagiriभारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरु करण्याची स्थानिकांची मागणी

भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरु करण्याची स्थानिकांची मागणी

सध्या कंपनी भंगारमध्ये काढण्याची स्थिती असल्यामुळे मिऱ्या येथील ग्रामस्थांनी सोमवारी भारती शिपयार्डच्या बाहेर आंदोलन केले.

रत्नागिरी जिल्ह्यात मिऱ्याबंदर येथील तीन हजारांहून अधिक स्थानिकांना रोजगार देणारी भारती शिपयार्ड कंपनी आहे. २०१३ नंतर जहाज बांधणी उद्योगात जागतिक स्तरावर मंदी आल्याने, जगातील सर्वच जहाज बांधणी प्रकल्पची अवस्था आर्थिकरित्या खराब झाली आहे. त्याचा मोठा फटका रत्नागिरीतील भारती शिपयार्ड कंपनीला बसला आहे. मिऱ्या येथील ग्रामस्थांनी भारती शिपयार्ड कंपनीबाहेर, कंपनी पुन्हा सुरु करा, भंगारात काढू नका. ती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी, स्थानिकांची रोजीरोटी बंद करू नका, एडरवाईज कंपनीने आमच्या नोकऱ्यांवर गदा आणू नये, अशा मागण्या करत आंदोलन केले.

भारती शिपयार्ड कंपनीचे देशात सहा ठिकाणी कंपनी सुरु आहेत, मग रत्नागिरीमधील देखील कंपनी पुन्हा सुरु करा. २०१४  पासून भारती डिफेन्स आणि इन्फ्रा लिमिटेड म्हणजेच पूर्वीची भारती शिपयार्ड कंपनी मालमत्ता पुनर्रचनेसाठी एडरवाईज कंपनीच्या नियंत्रणाखाली देण्यात आली आहे. मात्र सध्या कंपनी भंगारमध्ये काढण्याची स्थिती असल्यामुळे मिऱ्या येथील ग्रामस्थांनी सोमवारी भारती शिपयार्डच्या बाहेर आंदोलन केले. आंदोलनानंतर ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली.

दीपक कीर यांनी सांगितले की, एडरवाईजने कंपनीला १२००  कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात मात्र फक्त ३० कोटी रुपयेच दिले आहेत. त्यामुळे कंपनीचे काम थांबले आहे. त्याचप्रमाणे, प्रत्यक्षरित्या कोणतीही गुंतवणूक करण्यास परवानगी दिलेली नाही. कंपनी बंद केल्यामुळे तीन  हजारहून अधिक लोकांचा रोजगार बुडाला आहे. अशावेळी कंपनी भंगारमध्ये काढण्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

त्यामुळे ही कंपनी सुरु करण्यासाठी कोणीतरी उद्योजक किंवा सरकारने पुढाकार घ्यावा आणि भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरू करावी,  जेणेकरून स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल, अशी अपेक्षा राजेश तिवारी यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular