दापोलीतालुक्यातील जालगाव येथे राहणारा हर्ष अजय काताळकर याने दापोलीतील सुमारे १७ जणांना ५ कोटी ९९ लाखाचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अजूनही फसले गेलेल्यांची संख्या वाढणार असून फसवणुकीचा आकडा ८ ते १० कोटीच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दापोलीमधील हर्ष काताळकर याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो, असे सांगून सुमारे १७ जणांना गंडा घातला होता. दापोलीच्या पथकाने कर्नाटकमधील बंगलोर येथून काताळकर याला अटक केली होती.
त्याचे बैंक अकाउंट तपासले असता १७ जणांच्या तक्रारीनुसार सुमारे ५ कोटी ९९ लाखाचा गंडा घातल्याचे आकडा ८ ते १० कोटीच्या घरात जाण्याची शक्यता प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. काताळकर याने दापोलीबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्येही नातेवाईक मित्र यांच्या माध्यमातून अशाचप्रकारे फसवणूक केल्याची शक्यता पुढे येत आहे. त्या दृष्टीने दा पोली पोलिसांचे पथक ठाणे, रायगड या ठिकाणी चौकशी करीत आहे. काताळकर याचे बँक खाते पडताळणी सुरू असून मागील २ वर्षाचे रेकॉर्ड तपासावे लागत आहे. त्याच्या खात्यात कोणा-कोणाकडून पैसे आले आहेत.
तसेच ते पैसे कोणत्या खात्यात वर्ग झाले आहेत किंवा कोणत्या बँकेमधून काढले गेले आहेत, पैशाचा विनियोग कसा झाला आहे, या सर्व गोष्टींचा तपास करावा लागत असल्याचे दाप- ोली पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगधर यांनी सांगितले. मागील २ वर्षाचा हिशोब पाहता या १७ जणांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांचीही फसवणूक झालेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काताळकरला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने अजूनही काही धागेदोरे हाती लागतात का? याचा तपास दापोली पोलीस करीत आहेत. दापोलीव्यतिरिक्त अन्य तालुके व जिल्ह्यात अशा प्रकारे फसवणुकीबाबत तक्रार दाखल झाली आहे का? याचा तपासही दापोली पोलिसांकडून केला जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.