मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक घटनेने सारे हादरले. काही लुटारुंनी कुरिअरचे वाहन लुटण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी गाडीवर दगडफेक देखील केली. मात्र हा प्रयत्न असफल ठरला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना पकडण्यात यश मिळविले असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कुडाळ एमआयडीसीत असलेल्या ब्लू डार्ट कुरिअरच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वाहनाची लूट करण्यासाठी कुडाळ शहर परिसरातील काही युवकांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्लॅन रचला होता. ओसरगाव टोल नाक्यानजीक दबा धरून बसलेल्या आरोपींनी ब्लू डार्ट कंपनीच्या कुरिअरची गाडी ओसरगावटोल नाक्यावरून पास झाल्यानंतर तिचा पाठलाग केला. आपला कुणीतरी पाठलाग करतोय हे लक्षात आल्यावर कुरियर सर्विस गाडीच्या या चालकानेही. भरधावपण् गाडी पळवली. गाडी थांबत नाही अस दिसल्यावर या युवकांनी महामार्गाव पणदुरनजीक गाडीवर दगडफेक केली.
पोलिसांना खबर – तरी सुद्धा कुरिअर चालकाने गाडी थांबवली नाही आणि ही गाडी कुडाळ एम आयडीसीमध्ये असलेल्या गोडाऊनच्या ठिकाणी नेली. आपला कुणीतरी पाठलाग करतोय असा मेसेज ब्लू डार्ट कुरिअर सर्व्हिसच्या गाडी चालकाने ११२ नंबर वर दिला आणि पोलीस अलर्ट झाले तपास यंत्रणेची चक्रे गतीने फिरली. थर्टी फर्स्टची धूम असल्याने पोलिसांची रात्रीची गस्त गेले काही दिवस तेज गतीने सुरू आहे. ब्लू डार्ट गाडीचा पाठलाग होतोय असा मेसेज रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी फिल्डींग लावली. ब्लू डार्टच्या वाहनचालकाने दिलेल्या वर्णनाप्रमाणे बलेनो गाडी थांबलेली होती. मात्र या गाडीला नंबर प्लेट नसल्याने रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांचा संभ्रम वाढला सुदैवाने पोलीसची गाडी आपल्या मागे आहे हे बलेनोच्या चालकाला कळल्यावर त्याने गाडी जोरात एमआयडीसी परिसरातून हाकली त्या पाठोपाठ पोलिसांची गाडीही पाठलाग करीत होती पोलीस आपल्या मागे आहेत असे कळल्यावर बलेनोतील चालकाने गाडी पळवायला सुरुवात केली आणि थेट महामार्गाच्या दिशेने न जाता ही गाडी कुडाळ शहरात घातली.
गाडी आदळली – सोमवारपासूनच सुरू झालेला रोटरीचा फूड फेस्टिवल आटपून काहीजण नुकतेच आले होते. मात्र सुसाट वेगाने ही बनेनो गाडी कुडाळ शहर गांधी चौका नजीक आली आणि या गाडी ची दिशा बदलली आणि ही गाडी भाजपाचे युवा नेते बंड्या सावंत यांच्या निवासस्थानानजीक असलेल्या फास्ट पुढच्या टपरीला आदळली. तेथे असले उभ्या केलेल्या गाडीचे नुकसान झाले आणि ही बनेनो गाडीही नक्षत्र टॉवरसमोरील गार्डला आढळली आणि गाडीचा चेंदामेंदा झाला.
नागरिक चक्रावले – प्रकार बघून फूड फेस्टिवल आटपून आलेले काही नागरिक चक्रावले त्यातही गाडीतील काहीजणानी पळण्याचा प्रयत्न केला मात्र मागे पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांची टीम होतीच योग्य संधी साधत त्यांनी गाडीतील चालकाच्यागाडीतील चालकाच्या मुसक्या आवळल्या आणि पोलीस ठाण्यात आणले. काही संशयित राजकीय संबंधित असल्याने या घटनेचे वृत्त रातोरात शहरात पसरतात अनेकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली घटनेची गांभीर्यता कळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
अपघाताचा आवाज – याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी बलेनो कारम धूम पलायन करण्याचा प्रयत्न केला. भरधाव वेगात असलेल्या कारंवरील चालकाचा ताबा सुटल्याने गीता हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर कार थेट दुकानांवर आदळली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात घेतली.
६ संशयीत ताब्यात – पोलिसांनी चपळाईने तपासाची चक्रे फिरवत या लूट प्रकरणाशी संबंधित सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. विशेष बाब म्हणजे ताब्यात घेतलेले सर्व संशयित हे स्थानिक रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेमुळे कुडाळ शहरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास वेगाने सुरू केला आहे.

