26 C
Ratnagiri
Sunday, January 18, 2026

किनारपट्टी, गावांच्या संरक्षणासाठी बंधारे कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना

राज्यशासनाने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण...

रत्नागिरीत गुन्हेगारांवर आता ‘एआय’ ठेवणार नजर

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ऐतिहासिक...

समुद्रात मोठे वादळ, प्रतिकूल हवामानामुळे पुरेशी मासळी मिळेना

समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने...
HomeKhedऐन पर्यटन हंगामात पॉवर ब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल

ऐन पर्यटन हंगामात पॉवर ब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल

या दिरंगाईमुळे एक्सप्रेस सेवा त्यांच्या गंतव्य स्थानकांवर सुमारे २ ते ३ तास उशिरा पोहचते.

पनवेल रेल्वेस्थानकाच्या विस्तारीकरण आणि रेल्वे रुळांच्या अभियांत्रिकी कामे मार्गी लावण्यासाठी मध्य रेल्वेप्रशासनाद्वारे २४ डिसेंबर, रोजी पासून ३० डिसेंबर, रोजी पर्यंत मध्यरात्री पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान पॉवर ब्लॉक घेतला जात आहे. मात्र पॉवर ब्लॉक दरम्यान प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वे सेवांना इतर रेल्वे स्थानकावर तब्ब्ल १ ते २ तास नियमन करण्यात येत असते. अशा स्थितीत एक्सप्रेस सेवांमधील प्रवाशांचा नियमित खोळंबा होत असतो. पॉवर ब्लॉकदरम्यान मध्य रात्री पनवेल रेल्वे स्थानकावरून नियमित १३ एक्सप्रेस व मेल रेल्वे सेवा कोकण रेल्वे मार्गावर व इतर रेल्वे मार्गावर प्रवास करत असतात. यापैकी मडगाव एक्सप्रेस, एर्नाकुलम एक्सप्रेस, आणि मंगळुरू एक्सप्रेस सेवा या कोकण रेल्वे मार्गावरून नियमित रात्री १ ते वाजेदरम्यान प्रवास करतात. परंतु अलीकडे मध्य रेल्वे प्रशासनाने नियोजित केलेल्या पॉवर ब्लॉकमुळे या एक्सपप्रेस्स सेवांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. या ‘लांब पल्लधाच्या एक्सप्रेस सेवांना सोमाटणे, आप्त आणि कळंबोली रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येते अथवा कोकण रेल्वे मार्गावरील काही गर्डर स्थानी धीम्या गतीने प्रस्थान करण्यास सांगितले जाते.

या दिरंगाईमुळे एक्सप्रेस सेवा त्यांच्या गंतव्य स्थानकांवर सुमारे २ ते ३ तास उशिरा पोहचते. तसेच या संदर्भात काही संतप्त प्रवाशांच्या म्हणण्यानुसार पॉवर ब्लॉकदरम्यान नियमन करण्यात येणाऱ्या लांब पल्लधाच्या एक्सप्रेस व मेल रेल्वे सेवांनानिर्धारित वेळेपेक्षा जास्त थांबा देण्यात येत असते. २६ डिसेंबर, रोजी मध्य, रात्री प्रवास करणाऱ्या मडगाव एक्सप्रेसला १ तास करण्यात येणार होते मात्र मोटरमनने मडगाव एक्सप्रेस तब्ब्ल दीड तास उशिराने रवाना केली. तसेच मंगळुरू एक्सप्रेस सेवेला २ रेल्वे स्थानकावर सुमारे अर्धा ते पाऊण तास नियमन करण्यात आली. अशा प्रकारच्या गंभीर परिस्थिती नेहमीच उदभवत असते. रेल्वे प्रशासनाने ट्रेनच्या वेळा कटाक्षाने पाळून प्रवासांना सेवा द्यावी अशी म ागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular