26.3 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeMaharashtraराज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद...

राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु…

सर्वात आधी मोदी-शाह यांना साफ करा.

धर्म कोणताही असो तो घराच्या चार भिंतीआड पाहिजे, तो रस्त्यावर येता कामा नये. आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु तसेच रस्त्यावर नमाज पडणे देखील बंद करु, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घाटकोपरमधील प्रचार सभेत केले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. संजय राऊत म्हणाले की, हा भोंगा आम्ही गेले 20-25 वर्ष ऐकत आहोत. त्यासाठी सत्तेची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदी आणि शाह यांच्याबरोबर आहात, म्हणजे सत्तेबरोबर आहात. तुम्ही फडणवीस यांच्यासोबत आहात, म्हणजे सत्तेसोबत आहात. तुमच्या हातात सत्ता येईल की येणार नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असतो त्यासाठी सत्तेची गरज नसते. शिवसेनेने गेली 50-55 वर्ष कोणत्याही सत्तेशिवाय अनेकदा आपले अनेक कार्यक्रम राबवले, असे त्यांनी म्हटले.

सर्वात आधी मोदी-शाह यांना साफ करा – राज ठाकरेंनी मुंबईतील परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित करत सत्ता आली तर मुंबई 24 तासात साफ करू, असे म्हटले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, कशी साफ करणार? बोलायला सोपं असतं, महाराष्ट्राची राजधानी आहे. सर्वात आधी मोदी-शाह यांना साफ करा, तेच परप्रांतीय आहेत. सर्वात आधी मोदी, शाह, अदानी यांना साफ करा, या परप्रांतीयांनी मुंबई नासवली आहे. मुंबई आमच्या हातातून काढून घेण्याचं षडयंत्र त्यांनी रचलेले आहे. मात्र, दुर्दैवाने राज ठाकरे मोदी, शाह, अडणींना मदत करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे? – हा देश सगळ्यांचा असल्याचं सांगितलं जातंय. पण काही कायदेही आहेत. जर एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात यायचं असेल तर पहिल्यांदा पोलिसांना त्याची माहिती द्यायची असते. मुंबईच्या पोलिसांवर माझा 100 टक्के विश्वास आहे. संपूर्ण सत्ता माझ्या हातात दिला तर पोलिसांना 48 तास देईन. ही मुंबई साफ करा असं सांगेन. लोकसभेच्या निवडणुकीवेळी मौलवींनी फतवे काढले होते. मौलावी जर फतवे काढत असेल तर मीही आज फतवा काढतो. माझ्या ⁠सर्व उमेदवारांना मदत करा. ⁠पहिल्या 48 तासांत सर्व मशिदींवरील भोंगे खाली उतरवतो. ⁠जास्त अंगावर याल तर या खाकी वर्दीला रझा अकादमीचा बदला घ्यायला सागंण्याचा आदेश देईन, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

RELATED ARTICLES

Most Popular