25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriजिल्ह्यात पुन्हा वादळी पावसाचा ; सतर्क राहण्याचे आवाहन

जिल्ह्यात पुन्हा वादळी पावसाचा ; सतर्क राहण्याचे आवाहन

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातील उभे पीक आडवे झाले आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांत वादळीवारे व विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात गेले १५ दिवस दुपारनंतर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भातकापणीची कामे रखडली आहे. भातपीक पूर्ण तयार झाल्याने या पावसाने ते आडवे पडत आहे. त्यामुळे शेतकरी सकाळच्या वेळेत कापणी करून पीक घरात आणण्याची लगबग करत आहे. मात्र पाऊस तेवढा अवधीच देत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. दिवाळी तोंडावर आली तरी मुसळधार पाऊस पडत असल्याने हातचे पीक वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या वादळाचा परिणाम राज्यात जाणवणार नसला तरी हवामान विभागाने २४ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच विजांपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या अंदाजाप्रमाणे मंगळवारी (ता. २२) रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. दिवसभर पाऊस नव्हता. कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे अनेकजण खरेदीसाठी, फिरण्यासाठी सायंकाळी बाहेर पडले होते. मात्र रात्री अचानक गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तौरांबुळ उडाली.

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर – जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातील उभे पीक आडवे झाले आहे. अनेक भागांत पीक कापणी योग्य झाले असले तरी मुसळधार पावसामुळे शेतात जाता येत नाही. परिणामी हातातोंडाशी आलेले पिकाचे नुकसान तर होणार नाही ना यांची चिंता शेतकरी वर्गाला लागून राहिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular