23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeKhedराज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोटे येथील एअर मॉनेटरिंग सिस्टीमचे उदघाटन

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोटे येथील एअर मॉनेटरिंग सिस्टीमचे उदघाटन

कोकण किनारपट्टी लागत असलेल्या सिंधुदुर्ग, औद्योगिक वसाहतीत बसवण्यात आलेल्या एअर मॉनेटरिंग सिस्टीममुळे हवेत कोणत्या वायूचे किती प्रमाण आहे हे निरीक्षण करणे शक्य होणार आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीत उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध होत असल्याने या ठिकाणी उद्योजक येण्यास उत्सुक असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. लोटे औद्योगिक वसाहतीत बसवण्यात आलेल्या एअर मॉनेटरिंग सिस्टीमच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

रत्नागिरी, रायगड आणि पालघर येथील औद्योगिक वसाहतींमध्ये आता आवश्यक त्या सोयी सुविधाची सोय झाली कि, या औद्योगिक वसाहतीमध्ये नवनवीन उद्योजक यायला उत्सुक आहेत. सिंधुदुर्गामध्ये  आता चिपी विमानतळ सुरु झाल्याने अनेक औद्योगिक संधी सुद्धा उपलब्ध होतील, आणि त्याचा फायदा उद्योजकांनाच होणार आहे. औद्योगिक वसाहतीमंध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या कि, देश परदेशातील मोठे उद्योजक त्या औद्योगिक वसाहतींकडे गुंतवणूक करण्यासाठी सरसावतील.

कोकण किनारपट्टी लागत असलेल्या सिंधुदुर्ग, औद्योगिक वसाहतीत बसवण्यात आलेल्या एअर मॉनेटरिंग सिस्टीममुळे हवेत कोणत्या वायूचे किती प्रमाण आहे हे निरीक्षण करणे शक्य होणार आहे. यापुढे  कोणत्या कारखान्यातून कोणता वायू हवेत सोडला जात आहे याचा उलगडा या सिस्टीममुळे होणार आहे. ही सिस्टीम थेट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाशी जोडण्यात आली असल्याने वायू प्रदूषणावर तातडीने उपाय योजना करणे आता शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजापूर तालुक्यातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाबाबत माध्यमांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना छेडले असता, त्यांनी हा प्रकल्प नाणारमध्ये होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीचे क्रियाशील आमदार शेखर निकम, शिवसेना आमदार भास्कर जाधव, लोटे औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन,  लोटे सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे अध्यक्ष उद्योजक सतीश वाघ तसेच लोटे औद्योगीक वसाहतीतील कारखानदार आणि सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे संचालक आणि संबंधित  कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

RELATED ARTICLES

Most Popular