26.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeChiplunचिपळुणात उसळलं महायुतीचं वादळ आमदार शेखर निकमांचा अर्ज सादर

चिपळुणात उसळलं महायुतीचं वादळ आमदार शेखर निकमांचा अर्ज सादर

शिवपुतळ्याला आमदार शेखर निकम यांनी अभिवादन केले, त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली.

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे संगमेश्वर उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. शक्तीप्रदर्शन करीत महायुतीने एकजुटीचे दर्शन घडवले. सोमवार सकाळपासूनच आमदार शेखर निकम यांचे कार्यकर्ते आणि चाहते चिपळूणात दाखल होवू लागले होते. त्यामुळे चिपळूणात दुपारपर्यंत हजारो कार्यकर्ते एकवटले होते. जणूकाही जेनसागर लोटला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला, नगर पालिका येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील शिवपुतळ्याला आमदार शेखर निकम यांनी अभिवादन केले. त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. जोरदार घोषणा देत रॅली निघाली. चिंचनाका, मध्यवर्ती बस स्थानक, पॉवर हाऊस, महामार्गम ार्गे येऊन प्रांत कार्यालयात पोहोचली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे आमदार शेखर निकम यांनी, उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार सुनिल तटकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी सभापती शौकत मुकादम आदी उपस्थित होते.

जोरदार शक्तीप्रदर्शन – रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये वारकरी मंडळींनी भजनाचा ठेका धरला, हलगी वाजत होती, ढोल पथक लक्ष वेधून घेत होते. अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना शहर प्रमुख उमेश सपकाळ, भाजपचे नेते रामदास राणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबू ठसाळे, शिंदे गट सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, खेर्डीचे माजी सरपंच अनिल दाभोळकर, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपचे देवरुखमधील नेते प्रमोद अधटराव, माजी सभापती विजयराव गुजर माजी सभापती सौ. पूजा निकम, चित्राताई चव्हाण, जिल्हा बँक संचालिका दिशा दाभोळकर, मुक्ता निकम, माजी नगरसेविका शिवानी पवार, अदिती देशपांडे, स्वाती दांडेकर, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, जिल्हा बँक संचालक राजू सुर्वे, उदय ओतारी, किशोर रेडीज, पूनम भोजने, इम्रान कोंडकरी, ज्येष्ठ नेते दादा साळंबी, आरपीआयचे राजू जाधव, डॉ. राकेश चाळके, रुपेश कदम यांच्यासह राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना शिंदे गट, भाजप, आरपीआय आदी मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजय १ हजार १टक्के नक्की – उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी झालेल्या मेळाव्यात अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. या वेळी बोलताना माजी सभापती शौकत मुकादम यांनी, अर्ज भरण्यासाठी झालेली गर्दी पाहून आमदार शेखर निकम यांचा विजय एक हजार एक टक्के होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. आजची ही गर्दी विजयाची मुहुर्तमेढ रोवणारी आहे. आता गावागावात जाऊन महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी काम करा. लाडक्या बहिणींनी लाडका भाऊ आमदार शेखर निकम यांच्यासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

निकमांनी प्रेम वाटलं – भाजपचे दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आमदार शेखर निकम यांनी आमदार झाल्यानंतर मतदारसंघात प्रेम वाटलं. आज मोठ्या गर्दीने आपण सर्व त्यांचे आभार मानण्यासाठी आलात, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ऑक्टोबर हिट असताना, अंगाची लाही लाही होत असताना आपल्या लाडक्या नेत्याचा अर्ज भरण्यासाठी तुम्ही सकाळपासून गर्दीने आलात. २० नोव्हेंबरला असेच प्रेम कायम ठेवा, पुढची पाच वर्षे आमदार शेखर निकम तुमची काळजी घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular