27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriसुदेश, किरण, उदय तुम्ही एकत्र यावे, स्वरुपा सामंत यांची इच्छा

सुदेश, किरण, उदय तुम्ही एकत्र यावे, स्वरुपा सामंत यांची इच्छा

तुम्ही तिघे मिळून रत्नागरीचा विकास करू शकता.

उदय आणि सर्व बालमित्र आजही एकत्र आहेत, सोबत आहेत. याचा मला मनस्वी आनंद आहे. परंतु एक खंत आहे, ती तुझ्या समोर व्यक्त करते आणि तुला साद घालते की, तू, उदय आणि किरण एकत्र यावे. तिघांनी मिळून रत्नागिरीचा विकास करावा, अशी साद उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मातोश्री स्वरूपा रवींद्र सामंत यांनी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांना घातली. रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणात पुन्हा मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत आहेत. उदय सामंत आणि सुदेश मयेकर हे बालपणापासूनचे मित्र. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून दोघे राजकीय क्षेत्रात आले. एकमेकांच्या सुख-दुःखात एकत्र होणारे मित्र राजकीय घडामोडीमुळे वेगवेगळे झाले.

सुदेश मयेकर शरद पवार यांचे निष्ठावंत आहेत. त्यामुळे जेव्हा उदय सामंत यांनी पक्षांतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीला रामराम करत शिवेसनेमध्ये जाहीर प्रवेश केला तेव्हा उदय सामंत यांच्यासोबत ९० टक्के पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत गेले. परंतु सुदेश मयेकर हे निष्ठावंत असल्याने त्यांनी मैत्री बाजूला ठेवून आपली तत्त्वे जपत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले. पक्षाला अडचणीच्यावेळी त्यांनी मोठा आधार दिला, जिवंत ठेवले. दोन्ही मित्र विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात ठाकले. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले. सुदेश मयेकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंतर जिल्हाध्यक्ष झाले. मात्र जिल्हाध्यक्ष म्हणून काही निर्णयाला पक्षाने विरोध केल्यामुळे सुदेश मयेकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

या दरम्यान आज मंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस असताना या दोन्ही बालमित्रांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने उदय सामंत यांच्या आई स्वरुपा सामंत यांनी सुदेश मयेकर यांना साद घातली आहे. त्या म्हणाल्या, उदय आणि सर्व बालमित्र आजही एकत्र आहेत, सोबत आहेत. याचा मला मनस्वी आनंद आहे. परंतु एक खंत आहे. म्हणून तुला साद घालते की, तुम्ही बालमित्र एकत्र होता. बघता बघता मोठे झाला. प्रत्येकाच्या विचारधारा, व्यवसाय वेगवेगळे असले तरी मैत्रीची ओढ, आत्मियता आणि जिव्हाळा कायम आहे. किरण, उदय आणि तू एकत्र आलात, तर रत्नागिरीच्या विकासासाठी झटाल. तुम्ही तिघे मिळून रत्नागरीचा विकास करू शकता.

RELATED ARTICLES

Most Popular