26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriजिल्हा पुरवठा अधिकारी लाच घेताना रंगेहात सापडले

जिल्हा पुरवठा अधिकारी लाच घेताना रंगेहात सापडले

पथकाने सापळा रचला आणि ११ हजार रुपये स्वीकारताना पकडले.

शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला जिल्हा पुरवठा विभागातील या लाचखोरी संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संबंधित अधिकाऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. पुरवठा निरीक्षक संगमेश्वर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या धान्य गोदामाची तपासणी करत धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे कारण सांगत त्या संदर्भात नकारात्मक अहवाल बनविण्याचा इशारा देत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप केदार यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिल्या टप्प्यात ११ हजार रुपये देण्याचे ठरले.

दरम्यान तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविली. त्यानुसारं सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्यासह लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला आणि ११ हजार रुपये स्वीकारताना पकडले. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून रात्रौ उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जिल्हा पुरवठा अधिकारी लाच घेताना आढळल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular