25.4 C
Ratnagiri
Friday, October 31, 2025

देशातील सरकार घटना पाळतच नाही आ. भास्कर जाधव यांची सडकून टीका

७४ व्या घटना दुरुस्तीनंतर ऑक्टो. आज देशामध्ये...

ताम्हाणी घाटात अपघात, डोंगरावरून कोसळलेली दरड डोक्यात पडून महिला ठार

माणगाव-पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात माणगाव तालुक्यातील कोंडेथर...

पूररेषेतील बांधकामांना दिलासा ! नगरविकास विभागाकडून समिती

पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याने नियम शिथिल करावेत,...
HomeRatnagiriनवजात अर्भकावर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रीया यशस्वी

नवजात अर्भकावर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रीया यशस्वी

डोळ्याची तपासणी केली असता दोष असल्याचे पुढे आले.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात एका नवजात बालकावर लेझरद्वारे शस्त्रक्रीया करुन त्याला भविष्यात येणारे अंधत्व टाळण्यात यश आले आहे. अतिशय जोखम ीची अशी ही शस्त्रक्रीया डॉ. निकुंज भट यांनी यशस्वी केली. दापोलीत एका खाणीवर काम करणाऱ्या मुळच्या उत्तरप्रदेशमधील नवजात अर्भकावर ही शस्त्रक्रीया करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालयच्या नवजात शिशु देखभाल कक्षात हे बालक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचे वजन अवघे ११०० ग्रॅम इतके होते. त्याच्या डोळ्याची तपासणी केली असता दोष असल्याचे पुढे आले. या दोषामुळे कदाचित पुढे या बाळाला अंधत्व येण्याची शक्यता दाट होती.

तसेच लवकरात लवकर त्याच्या डोळ्यावर लेझरद्वारे शस्त्रक्रीया करणे आंवश्यक होते अन्यथा त्याची दृष्टी जाण्याची भीती होती. डॉ. निकुंज भट यांनी सी. एस. डॉ. संघमित्रा फुले गुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला. १९ डिसेंबर रोजी लेझर शस्त्रक्रीया करण्यात आली. ती यशस्वी झाली आहे. जन्माच्या ६९व्या दिवशी हे बालक पुर्णपणे बरे होवून घरी परतले. डॉ. निकुंज भट यांनी ही जोखमीची अवघड अशी शस्त्रक्रीया यशस्वी केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात या बालकावर पुर्णतः मोफत उपचार करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular