25.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...

चिपळूण बसस्थानकासाठी उपाययोजना करा – आमदार शेखर निकम

चिपळूण येथील हायटेक बसस्थानकाचे काम गेल्या ६...

रत्नागिरीतील जुने भाजीमार्केट पालिकेने पाडले

शहरातील धोकादायक बनलेल्या मच्छीमार्केट येथील जुनी भाजीमार्केटची...
HomeRatnagiri…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

सागरी हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नौका घुसखोरी करून मासेमारी करत आहेत.

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती साळवी यांनी कार्यक्षेत्रात दोन नौकांवर एलईडी लाईटचा व जनरेटर वापर करणाऱ्या नौकांवर कारवाई केली. परंतु रत्नागिरी, जयगड व नाटे या कार्यक्षेत्रातील परवाना अधिकारी व सुरक्षा रक्षक परप्रांतीय नौकांच्या घुसखोरी रोखण्याकडे डोळेझाक करीत आहेत. अशा सागरी सुरक्षा रक्षक व परवाना अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्ही उपोषणास बसू, असा इशारा रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला. जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नौका घुसखोरी करून मासेमारी करत आहेत.

परंतु अनेक परवाना अधिकारी आणि सुरक्षा रक्षक अशा बेकायदेशीर मच्छीमारीला प्रोत्साहन देत आहेत. तरी अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. याबाबत संघटनेतर्फे अनेक वेळा लेखी व प्रत्यक्ष भेटून बेकायदेशीर चालू असलेल्या पर्ससिन नेट व एलईडी लाईट नौकांवर कायदेशीर कारवाई करावी. परंतु आजतागायत अशा घुसखोरी करणाऱ्या पर्ससिन नेट नौकेवर कारवाई झालेली व केलेली दिसून येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

या पुढे बेकायदेशीर पर्ससिन नेट व एलईडी लाईटद्वारे मासेमारी ज्या बंदरातून होत असेल तर त्या बंदरातील परवाना अधिकारी व त्या कार्यक्षेत्रातील सागरी सुरक्षा रक्षक यांना त्याचक्षणी निलंबित करावे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आम्हांला उपोषणाला बसावे लागेल. या घुसखोरीमुळे आम्ही सर्व पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीच्या वेळ आली आहे. तसेच जयगड बंदरामध्ये परप्रांतीय मच्छीमार नौका राजरोजपणे मासेमारी करून ती मच्छी जयगड बंदरामध्ये उतरवली जात आहे. त्याचा पुरावा जी.पी. एस. पॉईंटचे छायाचित्र तारखेसहीत जोडण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular