भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका १८ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १८ नोव्हेंबरला वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना २० नोव्हेंबरला तर तिसरा अंतिम सामना २२ नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेसाठी भारताने हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक आणि रविचंद्रन अश्विन या दिग्गज खेळाडूना बसवण्यात आले आहे.
टी-२० मालिकेसाठी संघ पुढीलप्रमाणे आहे. हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर आणि उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव.
टी-२० मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिकाही होणार आहे. पहिला सामना २५ नोव्हेंबरला ऑकलंडच्या ईडन पार्कवर होणार आहे. दुसरा सामना २७ नोव्हेंबरला तर शेवटचा सामना ३० नोव्हेंबरला होणार आहे. शिखर धवन वनडेत संघाचे नेतृत्व करेल. या मालिकेतही रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
त्यासाठी पुढील संघ शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक अशाप्रकारे आहे.