30.6 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeMaharashtraवाघाच्या हल्ल्यात वनरक्षक ठार

वाघाच्या हल्ल्यात वनरक्षक ठार

संपुर्ण देशभर सध्या व्याघ्र गणना सुरू आहे. ताडोबातील वाघांची संख्या मोजण्याचे काम त्या अंतर्गत सुरू आहे. वाघांसह जंगलाचं रक्षण करणाऱ्या वनरक्षकावरचं वाघानं हल्ला केला. ताडोबा जंगलातील कोअर झोनमध्ये सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वनरक्षकाचं नाव स्वाती ढुमणे असे आहे.

महिला वनरक्षक स्वाती ढुमणे या चार वनमजुरांसोबत सकाळीच कोलारा कोअर झोनच्या कक्ष क्र. ९७ मध्ये गेल्या. तिथं वॉटर होलजवळ पाणी आहे की,  नाही याची पाहणी त्या करीत होत्या. दरम्यान, पाणवठ्याजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यात त्याने स्वाती यांना पकडून ओढत जंगलात नेले. सोबत असलेल्या वनमजुरांनी वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत त्याने स्वाती यांना ठार केलं होतं.

चंद्रपुर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाने केलेल्या हल्ल्यात महिला वनसंरक्षक ठार झाल्या आहेत. त्या आपल्या अन्य तीन सहकाऱ्यांसह वाघांच्या अस्तित्वाविषयी पायी पहाणी करण्यासाठी जंगलात गेल्या असताना त्यांच्यावर वाघाने हा अचानक हल्ला केला. त्यामध्ये स्वाती ढुमणे या वनसंरक्षक ठार झाल्या. या प्रकारानंतर तेथील पायी जाऊन व्याघ्र गणना करण्याचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान ढुमणे यांच्या कुटुंबाला नियमाप्रमाणे सर्व आवश्‍यक ती मदत दिली जाईल, असे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

व्याघ्र गणना मोहीमेसाठी त्या आपल्या सहकाऱ्यांसमवेत सकाळी सातच्या सुमाराला जंगलात गेल्या होत्या. त्यावेळी या पथकाला तेथे रस्त्यातच वाघाने ठाण मांडल्याचे दिसले. पथकाने वाघ रस्त्याच्या मधून जाईपर्यंत अर्धातास वाट पाहिली. त्यानंतर मात्र त्याला टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आणि नेमक त्याचवेळी वाघाने स्वाती यांच्यावर मागून हल्ला चढवला आणि त्यांना दाट जंगलात ओढून नेले. त्यानंतर जादा कुमक मागवून त्यांचा शोध घेतला गेला त्यावेळी स्वाती यांचा मृतदेहच त्यांच्या नजरेला पडला.

RELATED ARTICLES

Most Popular