मुंबई आणि कोल्हापूरच्या भाडोत्री गुंडाना चिपळूणमध्ये आणून हैदोस घालतोस का घालताय? ही सत्तेची मस्ती आणि हा माज आहे. भास्कर जाधव आमचे नेते आहेत. संपूर्ण न शिवसेना त्यांच्या पाठी खंबीर उभी आहे.आलेल्या गुंडावर जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही. येत्या दोन दिवसात रणनीती ठरवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काम करेल. मस्ती जिरवल्या शिवाय शांत बसणार नाही, असा थेट इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
चिपळूणमध्ये झालेल्या राड्यानंतर शिवसेना नेते खासदार विनायक राऊत बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात आले होते. येथील अप्पर जिल्हाअधीक्षक जयश्री गायकवाड यांची रत्नागिरीत भेट घेतल्यानंतर ते रात्री उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाले. यावेळी रोखठोकपणे त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले हो भास्कर जाधव आमचे नेते आहेत. रोज त्यांच्याशी माझे बोलणे सुरू आहे. शुक्रवारी जे काही चिपळूणमध्ये घडले ते राणे आणि कंपनीने ठरवून घडवले आहे. त्यासंदर्भात मी अप्पर जिल्हा अधीक्षक श्रीम. गायकवाड यांच्याशी बोललो आहे.
जर फक्त आमच्याच लोकांवर कारवाई होत असेल तर अजिबात सहन करणार नाही. निलेश राणेंनी जी गुहागर मध्ये सभा घेतली आणि त्यावेळी जे काही बोलले ती भाषा भाजपच्या मतदारांनाही अजिबात आवडणारी नव्हतीच. हिंम्मत असेल तर त्यांनी लोकसभा रिंगणात समोर उतरावे. कोकणातील जनता तुम्हाला पराभवाचे पाणी पाजल्याशीवाय गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.