27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriशिक्षक यादी लवकरच पवित्र पोर्टलवर, प्राथमिकची १५६६ रिक्त पदे

शिक्षक यादी लवकरच पवित्र पोर्टलवर, प्राथमिकची १५६६ रिक्त पदे

शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र नोर्टलवर जाहीर होईल. त्यामुळे जिल्ह्याला नवीन शैक्षणिक वर्षात १ हजार ५६६ शिक्षक नव्याने मिळणार आहेत. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि त्यानंतर समुपदेशानाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाईल. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. पवित्र पोर्टलवर अंतिम टप्यातील माहिती भरण्यासाठी उमेदवारांना १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. ती पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत.

पवित्र पोर्टलवर नावे नोंदवलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनला नियुक्तीची माहिती पाठवली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या आठवडाभरात होईल, अशी शक्यता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार, या भरतीमध्ये जिल्हा परिषदेला एकूण जागापैकी ७० टक्के रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये १ हजार ४५१ मराठी माध्यमाची आणि ११५ ऊर्दू माध्यमाची पदे रिक्त आहेत. पोर्टलवर नियुक्तीची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर समुपदेशनाने संबंधित शिक्षकांना रिक्त शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular