29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunत्या तलाठी, मंडल अधिकाऱ्यांवर कारवाई करा - प्रांताचे आदेश

त्या तलाठी, मंडल अधिकाऱ्यांवर कारवाई करा – प्रांताचे आदेश

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याची तक्रार अर्जदार हुमणे यांच्याकडून प्रांताधिकाऱ्यांकडे केली.

तालुक्यातील असुडें मंडल अधिकारी व आगवे तलाठ्याने प्रांताधिकाऱ्यांनी दिलेले आदेश बेदखल केले आहेत. आगवे येथील मालती बाळाराम हुमणे यांच्या अर्जानुसार अर्जदार आणि त्यांच्या सर्व कायदेशीर वारसांची नावे दाखल करण्यासाठी फेरवारस तपास करण्याचे आदेश दिले होते, मात्र हे आदेश धुडकावणाऱ्या संबंधित तलाठी व असुर्डे मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव सादर करावा. तसेच वरिष्ठांच्या आदेश धुडकावणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी तहसीलदारांना दिले आहेत. तालुक्यातील आगवे येथील हुमणे यांनी येथील उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे वडील (कै.) राजाराम बाबू गावणंग यांचा फेरवारस तपास करून आपले नाव वडिलोपार्जित असलेल्या सर्व मिळकतींना दाखल होऊन मिळण्यासाठी आरटीएस अपील दाखल केले होते.

या अपिलावर सुनावणी होऊन उपविभागीय अधिकारी यांनी ९ मार्च २०२३ ला निकाल दिला होता. यामध्ये फेरवारस तपास करून हुमणे यांच्यासह त्यांच्या सर्व कायदेशीर वारसांची नावे दाखल करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेश केले होते. दरम्यान, ९ मार्चला आदेश झालेला असूनही मिळकतींना (कै.) राजाराम बाबू गावणंग यांच्या नावे पूर्वस्थितीत आणण्यासाठी आदेशानंतर तब्बल नऊ महिन्याचा कालावधी लागला. फेरफारमध्ये नमूद वडिलोपार्जित मिळकतींना पूर्वस्थितीत दाखल करण्याकरिता नोंद घातल्यानंतर मंडळ अधिकारी असुर्डे यांनी ‘आदेशाची झेरॉक्स प्रत पाहिली आहे. आदेशाच्या मूळ प्रतीसह तहसीलदाराचे पत्र घ्यावे. त्यामुळे सदरची नोंद नामंजूर असा शेरा मारून प्रांताधिकाऱ्यांच्या मूळ आदेशाला केराची टोपली दाखवली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याची तक्रार अर्जदार हुमणे यांच्याकडून प्रांताधिकाऱ्यांकडे केली. हुमणे यांच्या अर्जानंतर उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदारांना नोटीस काढली आहे. त्यामध्ये त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदार त्याबाबत वेगळे कोणते आदेश तलाठी व मंडळ अधिकारी यांना देतात तसेच ते न दिल्यास उपविभागीय अधिकारी यांचा आदेश मंडळ अधिकारी यांना रद्द ठरवण्याचा अधिकार पोहचतो अगर कसे याबाबत अहवाल मागवला आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाईचा प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करावा, असे त्यात नमूद केले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नोटिसीनंतर तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांना नोटीस पाठवून याबाबत खुलासा मागवला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular