31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...

४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी...
HomeRatnagiriसाखरपा आयसोलेशन केंद्राची स्थापना

साखरपा आयसोलेशन केंद्राची स्थापना

आमदार राजन साळवी, सभापती जया माने आणि ग्रामस्थ यांच्या एकूण सहभागाने आज साखरप्यामध्ये महात्मा गांधी विद्यालय साखरपा येथे २५ बेडचे कोविड आयसोलेशन केंद्र स्थापन केले गेले आहे. रत्नागिरीमधील वाढणारी कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या पाहता, अपुरे पडणारे ऑक्सिजन बेड, रुग्णालयातील अपुर्या असणार्या सुविधा रुग्णासकट नातेवाईकांची होणारी फरफट थांबवण्यासाठी या आयसोलेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

मधील काळामध्ये साखरपा येथे कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून आली, त्यामुळे प्रत्येक वेळेस रुग्णाला उपचारासाठी एकतर देवरुख किंवा रत्नागिरी शहराच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी घेऊन यावे लागत असे. त्यामुळे सामान्य जनतेची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी सभापती जया माने यांनी खाजगी दवाखाने असणार्या डॉक्टरांची प्राथमिक केंद्रामध्ये बैठक बोलवली.आणि त्या बैठकीमध्ये जनतेची होणारी फरफट निदर्शनास आणून, सर्वाना इथे आयसोलेशन केंद्र सुरु करण्याचे आव्हान केले, सर्व खाजगी डॉक्टरांनीही ही गोष्ट सकारात्मकपणे घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

डॉक्टरांच्या आश्वासनानंतर सभापती जया माने यांनी प्रशासकीय यंत्रणेची परवानगी मिळवून, कोविड आयसोलेशन सेंटर साठी निधी जमवायला सुरुवात केली. जवळपासच्या भागातील दानशूर व्यक्तींना आवाहन करून कोविड आयसोलेशन सेंटरची स्थापना केली. त्यांनी स्वतः काही ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच परिसरातील दानशूर व्यक्ती, डॉक्टर्स यांच्या मदतीने १० ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था केली. सभापती यांनी स्थानिक डॉक्टरांना केलेल्या विनंतीचा मान ठेऊन काही डॉक्टर्स विनामोबदला या कोविड सेंटर मध्ये सेवा बजावण्यास तयार आहेत. आज महात्मा गांधी विद्यालय साखरपा येथील कोविड आयसोलेशन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले, या प्रसंगी, आमदार राजन साळवी, सभापती जया माने, नायब तहसीलदार, बीडीओ, डॉक्टर्स आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular