27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...

रत्नागिरी पोलिसांनी दोन दिवसांत गोव्यातून चोरांच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. रत्नागिरी...

परशुराम घाटात सुरु असलेल्या कामांना ११ महिन्यांची मुदत, सोबत पुनर्वसन

मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाच्या आणि ऐतिहासिक परशुराम मंदिरामुळे...
HomeSindhudurgतारकर्ली समुद्रात बोट पलटली, दोघांचा गुदमरून मृत्यू

तारकर्ली समुद्रात बोट पलटली, दोघांचा गुदमरून मृत्यू

तारकर्ली समुद्रात गजानन स्कुबा डायविंग सेंटरची बोट स्कुबा करून परतत असताना, लाटांच्या तडाख्याने बोट पलटली.

तारकर्लीच्या समुद्रात काल स्कुबा डायव्हिंगची बोट उलटून, या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा गुदमरून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणी मालवण पोलिसांत काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर वय ५२, रा.तारकर्ली,  बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक वय ५०, रा. देवबाग यांच्यासह अन्य पाच जण अशा एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी या बोटीतील पर्यटक लैलेश प्रदीप परब वय ३६, रा. अणाव कुडाळ यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार पुढे प्रक्रिया करून गुन्हा दाखल झाला. सर्व सातही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी ११.३० ते १२ च्या दरम्यान तारकर्ली समुद्रात गजानन स्कुबा डायविंग सेंटरची बोट स्कुबा करून परतत असताना, लाटांच्या तडाख्याने बोट पलटली. यामुळे सुमारे २८ जण समुद्राच्या पाण्यामध्ये फेकले जाऊन पुढील दुर्घटना घडली.

या दुर्घटनेमध्ये अकोला येथील आकाश भास्करराव देशमुख वय ३०, रा. शास्त्रीनगर अकोला व पुणे येथील डॉ. स्वप्नील मारुती पिसे वय ४१, रा. आळेफाटा पुणे या दोन पर्यटकांचा नाका तोंडात पाणी गेल्याने गुदमरून मृत्यू झाला होता. तर अन्य पर्यटक जखमी झाले होते. सकाळी १२ नंतर बचाव पथक व स्थानिक घटनास्थळी आले. त्यांनी उलटलेल्या बोटीतील पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. परंतु, दोघांचा जीव वाचवण्यात ते अपयशी ठरले.

या प्रकरणी पर्यटक लैलेश परब यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यावर रात्री उशिरा बोट मालक, चालक व अन्य स्कुबा डायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर वय ५२, रा.तारकर्ली,  बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक वय ५०, रा. देवबाग,  सुयोग मिलिंद तांडेल वय २३, रा. देवबाग,  विकी फिलिप फर्नांडिस वय ३२, रा. देवबाग, प्रथमेश रामकृष्ण बसंधकर ३१, रा. दांडी मालवण, तुषार भिकाजी तळवडकर वय ३९, रा. तारकर्ली,  विल्यम फ्रान्सिस लुद्रीक वय ५४, रा. देवबाग यांच्यावर भादवि कलम ३०४ (अ), ३३६, ३३७, २८०, २८२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक नरळे अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular