मुंबईमध्ये सोमवारी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास ऐन गर्दीच्यावेळी मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ विचित्र अपघात झाला. धावत्या लोकल ट्रेनमधून धडाधड खाली पडल्याने ६ प्रवाशांचा मृत्यू ओढवला. आहे. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोकल रेल्वेसेवेला मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणून ओळखले जाते. मात्र तीच प्रवाशांसाठी आज ‘डेथलाईन’ ठरल्याने मुंबईकरांवर संकट ओढवले आहे. दरम्यान असा अपघात आजवर पाहिला नाही, असे अनेकांनी सांगितले. या अपघातानंतर प्रचंड संतापाच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. अधिक वृत्त असे की, आठवड्याचा पहिला दिवस (सोमवार) असल्याने नेहमीप्रमाणे लोकलला प्रचंड गर्दी होती. चाकरमानी कामावर निघाले होते. कसाऱ्याहून सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) कडे निघालेल्या लोकलला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे अनेक प्रवासी फूटबोर्डवर उभे राहून लटकर प्रवास करत होते.
त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसंवरून निघालेली दुसरी लोकल या प्रवाशांना घासली आणि १३ प्रवासी रेल्वेतून खाली पडले. त्यातील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू ओढवला. तर २ प्रवाशांनी रूग्णालयात दम तोडला. २ प्रवाशांची ओळख पटलेली नाही. दरम्यान जखमींवर कळवा आणि मुंब्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १० जखमीपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळवा रुग्णालयाने दिली. तर कळव्यातील काही जखमींना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नेमका अपघात कुठे झाला? – बाजूने जाणाऱ्या ट्रेनला घासून अनेक प्रवासी खाली कोसळलेः अशी घटना इतिहासात प्रथमच झाल्याचे सांगितले जाते आहे. दोन ट्रेनमध्ये (रूळांमध्ये) इतकं कमी अंतर सहसा पहायला मिळत नाही. जिथे हा अपघात झाला ती जागा थोडी धोकादायक असल्याचे प्रवाशांनी सांगितले. दिवा स्थानकातून सुटल्यानंतर ट्रेन दीड किलोमीटर अंतर पार केल्यानंतर वळण घेते. दिवा व मुंब्रा स्थानकांमध्ये बरेच अंतर असल्यामुळे या भागात ट्रेन भरधाव वेगाने धावत असते. ट्रेन वळण येत असताना आतील प्रवासी दुसऱ्या राजूला ढकलले जातात. त्यामुळे दरवाजात उभे असलेले प्रवासी दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान दरवाजामध्ये उभे राहत नाहीत.
मात्र आज ते घडले – मात्र सोमवारी सकाळी ते घडले. सीएसएमटी धावणारी ट्रेन की तुडुंब भरली होती की मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. हा अपघात झाला. फूटबोर्डवर उभे राहून त प्रवास करणारे प्रवासी धडाधड कोसळले. त्यातील ६ जणांचा ओढवला आहे. जखमींची संख्या की किती आहे, याविषयी माहिती सळत नाही. सायंकाळी उशीरापर्यंत १० त्रासी जखमी असल्याचे अधिकृतपणे गण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नमींचा आकडा अधिक असण्याची यता व्यक्त होत आहे.
एकमेकांना घासली – या अपघाताची काही प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे कल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजांवरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि हा भीषण अपघात झाला.