20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriस्मार्ट मीटरविरोधात रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार

स्मार्ट मीटरविरोधात रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार

स्मार्ट मीटर बसविण्याचे तत्काळ थांबवा अन्यथा स्मार्ट मीटर बरोबर कार्यालय देखील फोडू.

स्मार्ट मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे मीटरच्या विरोधात शिवसेनेने महावितरण कंपनीवर मोर्चा काढला, हा मोर्चा माजी खासदार’ विनायक राऊत यांच्या नाचणे येथील संपर्क कार्यालयातून घोषणा देत महावितरण कंपनीवर धडकला. महावितरणच्या आवारातच त्याचे सभेमध्ये रुपांतर झाले. या मोर्चाचे नेतृत्व उबाठाचे सचिव विनायक राऊत, उपनेते आणि माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक रवी डोळस, रत्नागिरीचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे आदींनी केले. पहिला आवाज यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः उद्योगपती अदानींवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, या स्म ार्ट मीटरच्या बाबतचा पहिला आवाज २ वर्षांपूर्वी मी या रत्नागिरीमध्येच उठवला होता. त्यावेळेला मी खासदार होतो. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या ३४ जिल्ह्यांपैकी फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यात सरकारने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे.

आम्ही सुरूवातीपासून याला विरोध केला आणि आजही विरोध कायम आहे. याचे कारण या प्रीपेड मीटरचे गौडबंगाल आहे. पहिल्या मिटरबाबत सप्लायच्या तक्रारी होत्या, चुकीची रीडिंग करायचा, पण त्याच्यावर आमचा विश्वास होता. मात्र या स्मार्ट मीटरची आयडिया या राज्यकर्त्यांची नाही, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अदानी ग्रुपची आहे. त्यांनीच या स्मार्ट मीटरची निर्मिती केली आहे. अदानीने मुंबई लुटायला बसले आहेत, आता संपूर्ण देश लुटायला बघत आहेत, असा आरोप यावेळी विनायक राऊत यांनी केला.

शेतजमिनींची लूट – एवढच नाही तर आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या सह्याद्री पट्ट्यातल्या शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी खरेदी करण्यामागेही अदानी ग्रुप आहे, असा गंभीर आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी बोलताना केला. कोकणचे दुर्दैव आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जनतेच्या आणि कोकणवासीयांच्या हितासाठी पालकमंत्री नेमले आहेत. परंतु त्यांना जनतेच्या प्रश्नाचे काही घेणे देणे नाही. दोन्ही पालकमंत्री फक्त चमकोगिरी करत आहेत. या मीटरमुळे सरासरी येणाऱ्या बिलापेक्षा ५०० ते १००० रू. एवढे जादा वीज बिल येते. जिल्ह्यातील एकूण ग्राहकांचा विचार केला तर सुमारे १८० कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला लुटण्याचे काम अदानी करत आहे, असा आरोप करत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तत्काळ रद्द करावे, अन्यथा दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून त्यांच्यासमोर स्मार्ट मीटर फोडू, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.

अन्यथा मीटर बरोबर कार्यालय फुटेल! – दरम्यान मोर्चानंतर एक शिष्टमंडळ महावितरण कंपनीचे तिथेदेखील जोरदार वादावादी झाली. मुख्य अभियंता कुठे आहेत, असे अधीक्षक अभियंता माने यांना भेटले. माने यांना विनायक राऊत यांनी विचारले. ते मिटिंगला सावंतवाडीला गेल्याचे माने यांनी सांगितले. त्यामुळे राऊत संतापले, आम्ही येणार हे माहिती असताना ते गेले. स्मार्ट मीटर बसविण्याचे तत्काळ थांबवा अन्यथा स्मार्ट मीटर बरोबर कार्यालय देखील फोडू. जनमताचा विचार करून तुम्हाला स्मार्ट मीटर बसविणे बंद करावे लागेल, असे यावेळी उपनेते आणि माजी आमदार बाळ मानें यांनी सुनावले.

RELATED ARTICLES

Most Popular