21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurमद्यपींकडून करून घेतला धबधबा परिसर स्वच्छ

मद्यपींकडून करून घेतला धबधबा परिसर स्वच्छ

भविष्यामध्ये अशाप्रकारे वातावरण बिघडवणाऱ्यांना चांगलाच धडा देण्याचा इशाराही या वेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दिला.

तालुक्यातील येथील सवतकडा धबधबा गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या ठिकाणी बिनधास्तपणे मद्यपान करत वातावरण बिघडवणाऱ्या पर्यटकांना गावातील चुनाकोळवण अबिकेश्वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि जागरूक ग्रामस्थांनी चांगलाच धडा दिला आहे. वातावरण परजिल्ह्यातील मद्यपाना सज्जड दम देताना संबंधितांकडून त्या परिसराची स्वच्छताही करून घेतली. मुंबई-गोवा महामार्गावरून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील चुनाकोळवण येथील सवतकडा धवधवा गेल्या काही वर्षामध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. या घवघव्याच्या ठिकाणी स्थानिक लोकांसह पुणे, कोल्हापूर, मुंबई, सांगली आदी परिसरातीलही हौशी पर्यटक मोठ्या संख्येने येऊन निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटत आहेत.

पर्यटकांच्या संख्येमध्ये दरवर्षी अधिकच वाढ होत चालली आहे.मात्र निसर्ग परिसर आणि लोकवस्तीपासून काहीशा दूर असलेल्या या धबधब्याच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून त्या बिनदिक्कतपणे मद्यपान ठिकाणी बिनदिक्कतपणे केले जात असल्याचे चित्रही दिसत आहे. त्याचा त्रास त्या ठिकाणी कुटुंबीयांसमवेत आलेल्या महिला, तरुणी, लहान मुलांना होतो. त्याच्यातून त्या ठिकाणचे वातावरणही बिघडते. काही दिवसांपासून धबधबा परिसरामध्ये मद्यपान करून वातावरण बिघडवणाऱ्या पर्यटकांना चुनाकोळवण येथील श्री अंबिकेश्वर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच धडा दिला.

गावातील काही जागरूक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्यासह गावप्रमुख मधुकर मठकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुभाष गुरव, अनिल गुरव, गणेश गुरव, प्रदीप मेरे आदींनी वातावरण बिघडवणाऱ्या मद्यपींना दम देताना संबंधितांकडून त्या परिसराची स्वच्छताही करून घेतली. भविष्यामध्ये अशाप्रकारे वातावरण बिघडवणाऱ्यांना चांगलाच धडा देण्याचा इशाराही या वेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दिला. दरम्यान, उत्साही आणि मद्यपी पर्यटकांना प्रतिबंध करण्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याचे निवेदन प्रतिष्ठानच्यावतीने दिले आहे.

ग्रा.पं.कडून माहितीचे फलक – कोकणात तीव्र उताराचा भाग असल्याने पाऊस पडल्यानंतर काही मिनिटांमध्ये पाणी वाहत येते. याबाबत स्थानिक लोकांना माहिती असते. अन्य भागातून येणाऱ्या पर्यटकांना फारशी माहिती नसते. चार वर्षापूर्वी मुसळधार पावसामध्ये अचानक वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी आलेले पर्यटक वाहून जातात. सवतकडा धबधब्याच्या येथील भौगोलिक स्थितीसह पर्यटनस्थळाची माहिती आणि सुरक्षेच्यादृष्टीने सूचना देणारे फलक लावले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular