गीसह ताप, डोळे येणे याचे रुग्ण मुंबईत मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. गणेशोत्सवात मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने गावाला येणार असल्याने या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि महामार्गावर वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून २३ ठिकाणी आरोग्यपथके तैनात करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात ताप, कावीळ, गॅस्ट्रो, डेंगी मलेरिया रुग्ण आढळल्यास औषधोपचार करण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पथके नेमून दिलेल्या ठिकाणी तैनात राहणार असून, गावी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणार आहेत. महामार्गावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहणार आहेत औषधांचा साठाही पुरेसा ठेवण्यात येणार आहे.