सकल मराठा समाजाने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला जाहीर पाठींबा दिला असून कुणबी मराठा प्रमाणपत्राला सहमती देत त्यासाठी चिपळूण प्रांतकार्याल येथे गुरुवारी एक दिवसाचे साखळी उपोषण करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी झालेल्या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. शहरातील हॉटेल अतिथी येथे सकल मराठा समाज बांधवांची सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला सतीश कदम, सुबोध सावंतदेसाई, दिलीप देसाई, मकरंद जाधव, सतीश मोरे, सूरज कदम, जितेंद्र चव्हाण, रमेश शिंदे, सचिन नलावडे, शैलेश शिंदे, प्रभाकर मोरे, सौ निर्मला जाधव, ऐश्वर्या घोसाळकर, रश्मी मोरे, अनुजा भोसले, अंजली कदम, नीलिमा जगताप, दिलीप चव्हाण, कपिल शिर्के, आदींसह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते मुळात गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे.
कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे की नाही हा प्रत्येक मराठा बांधवाने ठरवायचे आहे. ज्यांना हवे त्यानी घावे अशी भूमिका आम्ही म मांडून एकत्र आलो आहोत असे यावेळी स्पष्ट करण्यात आले असून या बैठकीत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आणि घेतलेल्या भूमिकेला यावेळी पुन्हा पाठींबा व्यक्त करण्यात आला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी गुरुवार दि २ नोव्हेंबर रोजी चिपळूण प्रांतकार्यालसमोर एक दिवसीय साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सकाळी सात वाजता उपोषणाला प्रारंभ होणार आहे यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवून पुन्हा एकदा मराठ्यांची ताकद दाखवून देण्याची असल्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी समाजाच्या नेत्यांनी केले आहे.