27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRajapurराजापूरात आढळलेल्या अवाढव्य व्हेल माशाचा अखेर मृत्यू

राजापूरात आढळलेल्या अवाढव्य व्हेल माशाचा अखेर मृत्यू

जवळपास दोन ते अडीच तास प्रयत्न केल्यानंतर ही तो मासा खोल पाण्यात जात नसल्याने ती मोहीम थांबवण्यात आली.

तालुक्यातील होळी समुद्रकिनारी शुक्रवारी आढळलेला व्हेल प्रजातीचा सहा ते सात फुटी मासा मध्यरात्री उशीरापर्यंत समुद्रात लोटण्याचे ग्रामस्थाचे प्रयत्न अयशस्वी ठरले. प्रयत्न सुरु असतानाच तो मृत झाला. त्या माशाचे शवविच्छेन केल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी समुद्रकिनारी त्याला दफन केले. सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुक्रवारी ही बाब निदर्शनास आल्यानंतर काही स्थानिकांच्या मदतीने त्यांनी माशाला पाण्यात लोटण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार प्रयत्न करूनही तो खोल पाण्यात जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते व राजन लाड यांना फोनवरून माहिती देत काही लोकांना समुद्रकिनारी येता येईल का अशी विचारणा केली.

श्री. लाड यांनी तत्काळ सोशल मिडियाच्या माध्यमातून तशा आशयाचा मेसेज टाकताच या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आपदाचे प्रशिक्षण घेतलेले पंगेरे येथील आशिष पाटील, पिंट्या शिरवडकर, रूपेश कोठारकर, मनीष करगुटकर, समीर पावसकर, महेश मांजरेकर, गणेश बाणे, राजू गिरी आदिंसह दहा मिनिटात परिसरातील जवळपास २० ते २५ युवक तत्काळ होळी समुद्रकिनारी गोळा झाले. या सर्वांनी जवळपास सात ते आठ वेळा या माशाला खोल पाण्यात लोटण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येकवेळी तो पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर येऊन धडकत होता. त्यातच अरबी समुद्र खवळलेला होता.

उंच उंच लाटा येत होत्या. अशाही परिस्थितीत उपस्थितांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जवळपास दोन ते अडीच तास प्रयत्न केल्यानंतर ही तो मासा खोल पाण्यात जात नसल्याने ती मोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास वनविभागाचे रत्नागिरीचे परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, वनपाल सदानंद घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विक्रम कुंभार, दीपक म्हादये, दीपक चव्हाण, प्रथमेश म्हादये, निलेश म्हादये, विजय म्हादये, वैभव कुवेस्कर, रूपेश मोहिते, सागवेकर आदिंसह फिशरीज विभागाचे तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यांचेही प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर पहाटे ३ वा. च्या सुमारास तो मासा मृत झाला.

RELATED ARTICLES

Most Popular