तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायतीने तयार केलेला मैलागाळ व्यवस्थापन प्रकल्प राज्यासाठी आदर्श आहे, असे मत राज्यस्तरीय तपासणी पथकाचे प्रमुख सचिन जाधव यांनी व्यक्त केले. जिल्हा टीमने या प्रकल्पासाठी चांगले योगदान दिले आहे. सार्वजनिक शौचालयातील मैला गाळाचें व्यवस्थापन करण्यासाठी एक कोटी २७ लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च करून नदीत जाणारा मैला रोखल्याबद्दल विशेष कौतुक केले. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या राज्यस्तरीय तपासणी पथकाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. या पथकाचे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी स्वागत केले.
या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई उपस्थित होते. नाचणे ग्रामपंचायतीला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासह जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अजय माजगावकर उपस्थित होते. याप्रसंगी नाचणे सरपंच ऋषीकेश भोंगले यांनी सविस्तर प्रकल्पाची माहिती दिली. विस्तार अधिकारी परात्ये, ग्रामसेवक करंबळे, अभिषेक कांबळे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार सचिन सोनवणे, सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार यशवंती धत्तुरे, वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी यांनी माहिती जाणून घेतली.
या वेळी जिल्हा सल्लागार अजय माजगावकर, सर्जेराव पाटील, सविनय जाधव, संदेश म्हादलेकर, श्रद्धा धनावडे, आनंदा नाईक यांच्यासह गटसमन्वयकांनी पथकातील अधिकाऱ्यांना साह्य केले! ग्रामपंचायतस्तरावरील कुटुंबाचे सर्वेक्षण करून शौचालय बांधकाम व शौचालयं, कुटुंबस्तरीय कचरा व्यवस्थापन व वर्गीकरण माहिती संकलित, सार्वजनिक ठिकाणी कचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन पाहणी व तपासणी, शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत तसेच कुटुंबस्तरामधील शौचालय व पाण्याची सुविधा तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्रामधील स्वच्छता व शौचाल सुविधा पाहणी या पथकाने केली.