26.4 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunमहिलेला जबरदस्तीने गाडीत कोंबून लुटणाऱ्या दरोडेखोरांना पाठलाग करून पोलिसांनी पकडले

महिलेला जबरदस्तीने गाडीत कोंबून लुटणाऱ्या दरोडेखोरांना पाठलाग करून पोलिसांनी पकडले

अवघ्या काही तासात या अपहरणाचा छडा लावत आरोपींना पकडणाऱ्या अलोरे-शिरगांव पोलिसांचे कौतुक होत आहे.

बँकेतून फॅमिली पेंशनची रक्कम काढण्यासाठी निघालेल्या एका वयोवृद्ध महिलेला जबरदस्तीने गाडीत कोंबत ४ जणांनी तिचे अपहरण केले. काही अंतरावर गाडी जाताच तिच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने हिसकावून घेत ठार मारण्याची धमकी देण्यात आली आणि मारहाण करून या महिलेला गाडीतून खाली उतरवून पोबारा करणाऱ्या चौघांना अलोरे-शिरगांव पोलिसांनी पाठलाग करून पकडण्यात यश मिळवले आहे. अवघ्या काही तासात या अपहरणाचा छडा लावत आरोपींना पकडणाऱ्या अलोरे-शिरगांव पोलिसांचे कौतुक होत आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी या संघटनेबाबत पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बुधवारी २६ जुलैला सकाळी ९ वा.च्या सुमारास मुंढे गावातील एक ६५ वर्षीय वयोवृद्ध महिला गावातील आपल्या आणखी एका वयोवृद्ध महिलेसोबत चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेच्या शाखेमध्ये पैसे काढण्यासाठी निघाली होती. मुंढे एसटी स्टॉपवर शिरगांवला जाण्यासाठी बसची वाट पाहत या दोघी उभ्या होत्या. त्याचवेळी या महिलांसमोर एक पोपटी रंगाची कार येऊन उभी राहिली.

कुठे जायचेय? – या कारमध्ये चार-पाचजण होते. त्यांनी या महिलांना तुम्हाला कुठे जायचे आहे? असा सवाल विचारला. त्यांनी बँकेत जायचे आहे असे सांगितले. त्याचवेळी कारचालकाने एका महिलेला गाडीत पुढच्या सीटवर बसण्यास सांगितले. जणूकाही कोंबले. त्याचवेळी आता गाडीत जागा नाही असे सांगत या महिलेसोबत असलेल्या दुसऱ्या एका ज्येष्ठ महिलेला तिथेच सोडून ही कार सुसाट वेगाने घेऊन निघून गेले.

जिवे मारण्याची धमकी – गाडीत कोंबल्यानंतर चालकाने सुसाट वेगाने कार हाकली. काही अंतरावर जाताच ती थांबवण्यात आली आणि गाडीतील मंडळींनी या महिलेला जीवे मारण्याची धमकी तर दिलीच त्याचबरोबर मारहाणही केली. तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी (किंमत अंदाजे ९३,५०० रूपये) जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर तिला पुन्हा मारहाण करत गाडीबाहेर ढकलून देण्यात आले आणि कार पुन्हा सुसाट वेगाने निघून गेली.

पोलीस स्थानक गाठले – या प्रकाराने मुंढे येथील ही वयोवृद्ध महिला खूपच घाबरली. तरीही त्या स्थितीत तिने एसटी बस पकडली आणि थेट अलोरे-शिरगांव पोलीस स्थानक गाठले. पोलिसांना सारा प्रकार सांगितला. ज्या पोपटी कारमधून तिला पळवण्यात आले त्या गाडीचा नंबरदेखील या महिलेने पोलिसांना दिला. आरोपी
वर्णनदेखील सांगितले. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलीस पथक मागावर – महिलेची कैफियत ऐकून घेतल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे यांच्या ‘नेतृत्वाखाली पोलीस हे.कॉ. गणेश नाळे, पोलीस शिपाई राहुल देशमुख, महिला पोलीस होमगार्ड विजया चिपळूणकर हे पथक आरोपीच्या शोधाला लागले. ही कार कोणत्या दिशेने धावली याची माहिती मिळताच पोलिसांनी कुंभार्ली घाटात ही गाडी शिताफीने पकडण्यात यश मिळवले.

पाठलाग करून पकडले – पोलिसांची गाडी मागावर असल्याची कुणकुण लागताच पोपटी गाडीतील मंडळींनी आपली गाडी वेगाने पळवण्यास प्रारंभ केला. पोलिसांनीदेखील त्यांचा त्यांचा पाठलाग केला. कुंभार्ली घाटातच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे असलेली कारदेखील ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर संशयित आरोपींना अलोरे-पाठलाग करून पकडले पोलिसांची गाडी मागावर असल्याची कुणकुण लागताच पोपटी गाडीतील मंडळींनी आपली गाडी वेगाने पळवण्यास प्रारंभ केला. पोलिसांनीदेखील त्यांचा त्यांचा पाठलाग केला. कुंभार्ली घाटातच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे असलेली कारदेखील ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर संशयित आरोपींना अलोरे-पाठलाग करून पकडले पोलिसांची गाडी मागावर असल्याची कुणकुण लागताच पोपटी गाडीतील मंडळींनी आपली गाडी वेगाने पळवण्यास प्रारंभ केला. पोलिसांनीदेखील त्यांचा त्यांचा पाठलाग केला. कुंभार्ली घाटातच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे असलेली कारदेखील ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर संशयित आरोपींना अलोरे-शिरगांव पोलीस स्थानकात आणण्यात आले. चौकशीअंती चौघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध भा.दं. वि.क. दरोड्याच्या आरोपाखाली ३९४ अन्वये तसेच ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

४ जणांना अटक – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ४ संशयित आरोपींना बुधवारी सायंकाळी ६.१८ वा.च्या सुम रास अटक करण्यात आली आहे. सुरज समाधान काळे (वय २१, रा. कुंभारी, जिल्हा उस्मानाबाद), सरस्वती सुरज काळे (वय २१, रा. कुंभारी, उस्मानाबाद), राहुल अनिल शिंदे (वय ३५, रा. सारोळे, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर) आणि कामिनी राहुल शिंदे (वय ३२, रा. सारोळे, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी पत्रकारांना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular