अत्याधुनिक प्रकल्पाबरोबरच आपल्या दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे मे. वाशिष्ठी मिल्क ण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या प्रकल्पाची लोकप्रियता आता केवळ कोकणापुरतीच मर्यादीत राहिली नसून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील उद्योजकांपर्यंत पोहचली आहे. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य मलिकार्जून उटगे यांचे चिरंजीव तथा स्नेहश्री ग्रोजेनिक प्रा. लि. या कंपनीचे सर्वेसर्वा शिवम श्रीशैल्य उटगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी मे.वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत सत्यम उटगे आणि विकास उटगे उपस्थित होते. मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. चे व्यवस्थापक प्रदीप मगदूम यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला.
प्रकल्पाच्या उभारणी मागची संकल्पना आणि प्रकल्पाबाबत माहिती त्यांनी मान्यवरांना दिली. संपूर्ण प्रकल्प पाहिल्यानंतर शिवम उटगे यांनी प्रकल्पाचे कौतुक केले. गेल्या वीस वर्षांत राज्यभरातील अनेक दुग्धप्रकल्प पाहिले परंतु अशा पद्धतीचा अत्याधुनिक प्रकल्प पहिल्यांदाच पाहत आहे, अशा शब्दात शिवम उटगे यांनी प्रकल्पाचे कौतुक केले. प्रकल्प स्थापनेमागचे प्रेरणास्थान तथा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, प्रकल्पाचे संचालक तथा चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्यासह प्रकल्पाच्या उभारणीत सहभागी इतर सहकाऱ्यांच्या धाडसाचेही मान्यवरांनी यावेळी कौतुक केले.
प्रकल्पाच्या शॉपींच्या संकल्पनेसह उत्पादनांचा दर्जा आणि ग्राहकांना दिली जाणारी सेवाही अप्रतिम असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदीप मगदूम यांनी शेवटी प्रकल्पाच्या वतीने मान्यवरां धन्यवाद दिले.