26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKhedकोकण रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही बिघडलेले

कोकण रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही बिघडलेले

१८ रेल्वेगाड्या विलंबानेच धावल्याने चाकरमानी खोळंबले.

लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर कोकणात आलेले चाकरमानी परतीला निघाले आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणाऱ्या तोबा गर्दीतून रेटारेटीसह लटकंतीचा प्रवास करत मुंबई गाठताना चाकरमान्यांची दमछाक होत आहे. त्यात रखडपट्टीच्या प्रवासाची भरही अद्याप कायमच आहे. रेल्वेगाड्यांमध्ये ‘एन्ट्री’ मिळवताना गणेशभक्तांची चढाओढच सुरू आहे. रविवारीही बिघडलेल्या वेळापत्रकाने गणेशभक्तांचा मनस्ताप कायमच राहिला. १८ रेल्वेगाड्या विलंबानेच धावल्याने चाकरमानी खोळंबले. कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह सर्वच गणपती स्पेशल हाऊसफुल्लच धावत आहेत.

एकीकडे रेल्वेगाड्यांना उसळणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांची यातायात सुरू असतानाच रेल्वेगाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकाने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. विलंबाच्या प्रवासाने गणेशभक्तांचे परतीच्या प्रवासातही तारेवरची कसरतच सुरू आहे. कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांचा अतिरिक्त ताण वाढल्याने वेळापत्रक विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही रखडपट्टीच्या प्रवासात चाकरमानी रेल्वेगाड्यांतूनच प्रवास करण्यास पसंती देत आहेत. मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांमुळे रविवारी त्या त्या स्थानकात गर्दी उसळलेली असतानाच १८ रेल्वेगाड्याही उशिरानेच मार्गस्थ झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. ०११६६ क्रमांकाची मंगळूर-एलटीटी गणपती स्पेशल तब्बल ८ तास २० मिनिटे विलंबानेच रवाना झाली.

०११३९ क्रमांकाची नागपूर -मडगाव स्पेशल ४ तास तर ०११५२ क्रमांकाची मडगाव- सीएसएमटी स्पेशल ४ तास २० मिनिटे विलंबाने धावली. ०११५६ क्रमांकाची चिपळूण- दिवा मेमू स्पेशल १ तास ०११६५ क्रमांकाची एलटीटी-मंगळूर गणपती स्पेशल ४ तास ४० मिनिटे उशिरानेच धावली. ०११८८पनवेल-कुडाळगणपती स्पेशल ४ तास १० मिनिटे, ० ०१५९२ क्रमांकाची मडगाव- सीएसएमटी एकेरी स्पेशल २ तास १० मिनिटे, ०९०१९. क्रमांकाची मडगाव-उधना स्पेशल ३ तास ४० मिनिटे, १०१०३ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस २ तास, १०१०४ क्रमांकाची मडगाव- सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस १ तास ४० मिनिटे, १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर २ तास २५ मिनिटे ११०९९ क्रमांकाची एलटीटी-मडगाव एक्सप्रेस ५ तास २० मिनिटे, १२१३३ क्रमांकाची सीएसएमटी-मंगळूर एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली.

१६३३७ क्रमांकाची ओखा एक्सप्रेस २ तास १५ मिनिटे, १५३४६ क्रमांकाची तिरुवअनंतपूरम -एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस २ तास १० मिनिटे, १९५७८ क्रमांकाची जामनगर- तिरूनेलवेली एक्सप्रेस १ तास १० मिनिटे, २२४१३ क्रमांकाची मडगाव-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस १ तास विलंबानेच धावल्या. रविवारी कोकण मार्गावरील त्या-त्या रेल्वेस्थानकात मुंबईला. जाणाऱ्या चाकरमान्यांची अलोट गर्दीच उसळली. या विक्रमी गर्दीतून स्थानकात दाखल होणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश मिळवताना चाकरमान्यांची दमछाक झाली. याशिवाय स्थानकात सुरक्षिततेसाठी तैनात यंत्रणांचीही त्रेधातिरपीटच उडाली.

RELATED ARTICLES

Most Popular