27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeChiplunचिपळुणातील अपघातग्रस्त एसटी चालकाचा अखेर मृत्यू

चिपळुणातील अपघातग्रस्त एसटी चालकाचा अखेर मृत्यू

टेम्पोवर आदळल्याने ते दूर फेकला गेले, गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले.

शहरातील  मुंबई-गोवा महामार्गावर पागनाका गोपाळकृष्णवाडी येथे समोरून येणाऱ्या टेम्पोला मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला. ते एसटी बसचालक होते. विशाल शंकर शिंदे (३६, रा. निसरे फाटा, पाटण) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला. पोलिसांनी सांगितले, की चिपळूण आगारात विशाल शंकर शिंदे (३६, रा. निसरे फाटा, पाटण) हे चालक म्हणून नोवनी करत होते. ते कर्तव्य बजावून दुपारीच घरी गेले होते मात्र सायंकाळी कामानिमित्त दुचाकीने चिपळूणहून कापसाळकडे मोटारसायकलने जात होते. याचवेळी प्रचंड पाऊस पडत असताना अंचारही झाला होता.

पागनाक्यातून जाताना समोरून गोव्याहून चिपळूणकडे येणाऱ्या टेम्पोला त्याच्या मोटारसायकलची समोरासमोर जोरदार घडक बसली. टेम्पोवर आदळल्याने ते दूर फेकला गेले, गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. अपघाताचे वृत्त समजताच तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी विशाल शिंदे त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वेळी अपघातस्थळी गर्दी झाली होती. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

पोलिस निरीक्षक रवींद्र रिदि व त्यांचे सहकारी तसेच आगारप्रमुख रणजितः राजेशिर्के आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. या अपघाताची नोंद चिपळूण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मूळ पाटण तालुक्यातील विशाल नुकतेच एसटीमध्ये चालक म्हणून नोकरीला लागले होते. दीड वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगादेखील आहे. नोकरीनिमित ते चिपळूण कापसाळ येथे भाड्याने राहत होते. विच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या देण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular