31.6 C
Ratnagiri
Thursday, April 25, 2024

चिपळुणात हापूसच्या नावाखाली कर्नाटकच्या आंब्यांची विक्री

शहरात हापूस आंबा विक्रीमध्ये परप्रांतीय विरुद्ध स्थानिक...

माझ्या जीवात जीव असेपर्यंत काम करत राहणारः सुनिल तटकरे

निवडणूका येतात जातात, मात्र आम्ही जनतेच्या कामासाठी...

अमित कदम यांचा राष्ट्रवादी पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश

महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीकृष्ण हॉल, नायगाव...
HomeMaharashtraकेवळ एका मिनिटात कोकण रेल्वे फुल्ल!! गणपतीला जाण्यासाठी तिकीट न मिळाल्याने चाकरमानी संतप्त

केवळ एका मिनिटात कोकण रेल्वे फुल्ल!! गणपतीला जाण्यासाठी तिकीट न मिळाल्याने चाकरमानी संतप्त

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण सुरू होते न होते तोच अवघ्या एका मिनिटात गाडी फुल्ल झाल्याचे संदेश दिल्याने चाकरमानी आश्चर्यचकीत झाले आहेत. केवळ एका मिनिटात रेल्वे कशी फुल होते हे बहुधा त्या बाप्पालाच ठाऊक अशी तीव्र प्रतिक्रिया अनेक कोकणवासियांनी व्यक्त केली आहे. ‘कुछ तो गडबड है… रेल्वे कर्मचाऱ्यांचे आणि तिकीट एजंटांचे साटेलोटे तर नाही ना’ अशी शंका सोशलमिडीयावर उपस्थित करण्यात येते आहे. नोकरीधंद्यासाठी मुंबईत आलेला चाकरमानी न चुकता गणेशोत्सवाला गावी जात असतो. गावी जाण्यासाठी कोकण रेल्वे हा एक परवडणारा प्रवास आहे. सोयीचादेखील आहे. त्यामुळे कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून चाकरमान्यांनी प्रवासासाठी रेल्वेलाच पसंती दिली आहे.

अवघ्या एका मिनिटात… – रेल्वेच्या नियमाप्रमाणे गणेशोत्सवासाठीच्या गाड्यांचे आरक्षण १२० दिवस आधीच सुरू झाले. आरक्षण सुरू होताच अवघ्या एका मिनिटात आरक्षण फुल झाल्याचे संदेश मिळाले. अनेकांना तिकीट खिडकीवरून हात हलवत माघारी परतावे लागले किंवा वेटींग तिकीट घेऊन जावे लागले. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना ‘रिग्रेट’ मेसेज पहावा लागला. यामुळे चाकरमानी अवाक् झाले. तर आता हे नेहमीचेच झाले आहे अशी संतप्त प्रतिक्रिया काही कोकणवासियांनी दिली आहे.

कुछ तो गडबड है – केवळ एका मिनिटात सगळ्या गाड्या फुल होणे या मागे ‘कुछ तो ‘गडबड है’ अशी शंका आता चाकरमान्यांना येऊ लागली आहे. गेल्या दोन-तीन वर्षाचा हा अनुभव पाहून अनेक चाकरमान्यांनी या सगळ्या प्रकाराबाबत संशय व्यक्त केला आहे. आपल्या हक्काच्या कोकण रेल्वेत एक कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी झगडावे लागते याविषयी प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

साटेलोटे तर नाही? –  आपला हा संताप चाकरमान्यांनी सोशलमिडीयावर चांगलाच प्रकट केला आहे. ‘कुछ तो गडबड है…. रेल्वे कर्मचाऱ्यांचे तिकीट एजंटांशी साटेलोटे आहे’ अशा संतप्त शब्दातील पोस्ट सोशलमिडीयावर व्हायरल झाल्या असून हा काळाबाजार सुरू आहे. तो रोखण्यासाठी या तिकीट बुकिंगची चौकशी व्हावी अशी मागणी एका प्रवाशाने प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

चाकरमान्यांची व्यथा –  एका नियमित प्रवाशाने आपली व्यथा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मांडताना सांगितले की, गेली कित्येक वर्षे आम्ही रेल्वेने मुंबई ते कणकवली अथवा कुडाळ असा प्रवास करतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून एप्रिल, मे महिना असो किंवा गणपती उत्सव असो कोकण रेल्वेचे तिकीट मिळत नाही. या प्रवाशाने आपली ही व्यथा अगदी तारीख, वार आणि वेळेसह मांडली असून हा अन्याय असल्याचे त्याने म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular