25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeKhedमहिलेला गुप्तधनाची लालूच दाखवत ४० लाख रुपयांना घातला गंडा

महिलेला गुप्तधनाची लालूच दाखवत ४० लाख रुपयांना घातला गंडा

पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, भरणे-गणेशनगर येथे राहणाऱ्या विठाबाई पवार या मोलमजुरीचे काम करतात.

तुमच्या घरात गुप्तधन आहे ते मी काढून देतो असे सांगत घरात तंत्रमंत्र, पूजापाठ, होमहवन करून महिलेची ४० लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ३ तथाकथित मांत्रिकांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सौ. विठाबाई आण्णाप्पा पवार ( वय ४८ रा. भरणे गणेशनगर) यांनी खेड पोलिसात दिली आहे, असे पोलिसांनी पत्रकारांना याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले. पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, भरणे-गणेशनगर येथे राहणाऱ्या विठाबाई पवार या मोलमजुरीचे काम करतात.

संशयित आरोपी प्रसाद हरिभाऊ जाधव (वय ४७ रा. गिरेवाडी, ता. पाटण जि. सातारा), विवेक यशवंत कदम (वय ४८ रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा) आणि ओंकार विकास कदम (वय २३ रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा) यांनी विठाबाई पवार यांचा विश्वास संपादन केला. तुमच्या घरात गुप्तधन असल्याची बतावणी करत आम्ही ते काढून देतो असे सांगितले. त्यासाठी घरात होमहवन, तंत्रमंत्र-पूजापाठ करून विठाबाई पवार यांच्याकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून संशयित आरोपी प्रसाद हरिभाऊ जाधव याने पूजापाठ करीता ४० लाख ६५ हजार रुपये घेतले.

तर त्यांचा मुलगा रोहित याच्या गृहशांतीसाठी २५ हजार रुपये असे एकूण ४० लाख ९० हजार रुपये घेऊन तिघांनी फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही घटना १ मार्च २०२२ रात्री १२ ते १७ ऑगस्ट २०२३ रात्री १२ वाजण्याच्या मुदतीत घडली असून याबाबत तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (१), २ तर भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular