27.2 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यांना कुलूप

कोकणरेल्वे मार्गावरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या...

वाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज – स्वखर्चाने वाहतूक

चिपळूण शहरांमध्ये पुराचे पाणी भरते त्याला वाशिष्ठी...

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्हा परिषद व पंचायत झालेल्या अधिकारी, कर्मचान्यांना...
HomeRatnagiriरत्नागिरीत बंगला फोडून १० लाखांची चोरी…

रत्नागिरीत बंगला फोडून १० लाखांची चोरी…

बंगल्याचा मागचा दरवाजा कोणत्यातरी धारदार हत्याराने तोडून चोरट्याने प्रवेश केला.

शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. रविवारी (ता. २३) शहरातील भारतनगर, साळवी स्टॉप येथील पालकर कुटुंबीय मुलाच्या लग्नासाठी इस्लामपूर येथे गेल्याच्या संधीचा फायदा घेऊन त्यांच्या बंगल्याच्या मागचा दरवाजा फोडून चोरट्यांनी १० तोळे सोने व २ लाख ३२ हजार रुपय रोख असा सुमारे दहा लाखांचा ऐवज पळविला. हा प्रकार गुरुवारी (ता. २७) सकाळी उघड झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी (ता. २७) उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भारतनगर, साळवी स्टॉप येथे फिर्यादी फिरोज कुतबुद्दीन पालकर यांचा बंगला आहे. रविवारी दुपारी घरातील सर्व मंडळी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी इस्लामपूर येथे गेले होते. शेजारी रहाणाऱ्या नागरिकांनी मंगळवारी (ता. २५) त्यांना फोन करून चोरट्यांनी बंगला फोडल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली.

पालकर यांच्या बंगल्याचा मागचा दरवाजा कोणत्यातरी धारदार हत्याराने तोडून चोरट्याने प्रवेश केला. घरातील कपाटातील १० तोळे सोने व रोख रक्कम २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. याप्रकरणी फिरोज पालकर यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर मिळताच शहर पोलिसाचे पथक तसेच पोलिस उपाधीक्षक नीलेश माईणकर यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली अद्यापही तपास सुरू आहे. शिमगोत्सवाच्या दिवसात घरफोडीच्या घटना नियमित घडतात. घर बंद करून नागरिक गावाकडे जातात. याच संधीचा फायदा घेऊन घरफोड्या मोठ्या प्रमाणात होत असतात. आजची घटना ही सराईत गुन्हेगाराकडून झालेली असल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी हॉऊसिंग सोसायटी, तसेच बंगला आदी ठिकाणी सीसीटीव्ही लावून घ्यावेत, असे आवाहन डीवायएसपी नीलेश माईणकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular