19.9 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeChiplunसावर्डेमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी ४ दुकाने फोडली

सावर्डेमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी ४ दुकाने फोडली

स्वप्नील विजय खेडेकर यांचे ओंकार ज्वेलर्स दुकान असून गेल्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे प्रवेश करून आतील १ ग्रॅम बेंटेक्सचे २९ हजार २० रुपयांचे दागिने लंपास केले.

तालुक्यातील सावर्डे-डेरवण मार्गावरील अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत दोन दुकानांतून ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यात तिघेजण असल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे. या चोरट्यांनी आपला चेहरा लपविण्यासाठी रुमालदेखील तोंडाला बांधलेला नाही. तर उलट राजरोसपणे बिनधास्त चोरी करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून दिसत आहे. या घटनेची सावर्डे पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सावर्डे – डेरवण मार्गावर स्वप्नील विजय खेडेकर यांचे ओंकार ज्वेलर्स दुकान असून गेल्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करून आतील १ ग्रॅम बेंटेक्सचे २९ हजार २० रुपयांचे दागिने लंपास केले. तसेच रुपेश किराणा स्टोअर्समधील ७ हजार रुपयांची चिल्लर या चोरट्यांनी लंपास केली आहे. एकंदरीत ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. तसेच केदारनाथ हार्डवेअर व सुपर मार्केट फोडून मधील ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दुकानात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच सावर्डे पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular