27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriरत्नागिरीत आलेल्या डोळ्यांच्या साथीने शेकडो लोकं हैराण

रत्नागिरीत आलेल्या डोळ्यांच्या साथीने शेकडो लोकं हैराण

डोळे येणे आजार हा एक प्रकारचा डोळ्यांचा संसर्ग आहे.

जिल्ह्यात रेड फ्लॅग आणि आय फ्ल्यू म्हणजेच डोळ्याची साथ पसरली आहे. गेल्या तीन दिवसात जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या दीडशे रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची नोंद झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना सांगितले. हा संसर्गजन्य आजार असल्याने सर्वांनीच दक्ष राहण्याची गरज आहे. ज्यांना डोळे आले आहेत त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यात आता कोरोना हद्दपार झाला आहे. मात्र आता डोळे येणे या नव्या संसर्गजन्य रोगाने डोके वर काढले आहे. शाळा, कॉलेजमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही ठिकाणी तर मुलांना शाळेने सुट्टी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून डोळ्याच्या साथीचा फैलाव होताना दिसत आहे. डोळे येणे आजार हा एक प्रकारचा डोळ्यांचा संसर्ग आहे. त्याला रेड फ्लॅग किंवा आय फ्ल्यू असेही म्हणतात. डोळे येणे हा आजार झाल्यानंतर डोळे लाल होतात तसेच त्यांना सूज येते. जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या तीन दिवासांमध्ये शंभर ते दीडशेच्या वर रुग्ण उपचारासाठी येऊन गेल्याची नोंद झाली आहे. या संसर्गजन्य रोगाला थोपविण्यासाठी स्वच्छता आणि इतरांचा संपर्क टाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

डोळे येणे आजारावर प्रतिबंधक उपाय : डोळे किंवा चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर हात धुवून घ्यावा, टेबलाचा पृष्ठभाग आणि दरवाज्याचे हॅण्डल, सर्वजनिक वापराच्या वस्तू यांना कमीत कमी स्पर्श करावा, तुमचे डोळे लालसर आहेत तोपर्यंत शाळेत किंवा कामावर जाणे टाळावे, डोळे स्वच्छ धुणे, दुसऱ्याचे औषध, आय ड्रॉप वापरू नका, दुसऱ्यांची उशी, बेडशीट यांसारख्या वस्तू वापरणे टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular