एकीकडे सूर्य मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भाजून काढतोय, अशातच दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने दिलीय. यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पावसाचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असं भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तवलं आहे.
महापात्रा म्हणाले, यंदा सामान्यहून अधिक पाऊसाचा अंदाज आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान १०६ टक्के पाऊसाचा अंदाज आहे. यंदा सामान्य पेक्षा चांगली परिस्थिती आहे. ८ जून पर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे. अल निनोची परिस्थिती सध्या अधिक प्रगत झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपला असेल. अल निनो चा प्रभाव कमी होतो आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे.
दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातदेखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस होतो, भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.