27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiri'उमेद'च्या हजारो महिलांचा रत्नागिरीत मोर्चा

‘उमेद’च्या हजारो महिलांचा रत्नागिरीत मोर्चा

आमच्या मागण्या मान्य करा, अशा घोषणा देत जिल्हा परिषदेतून हा मोर्चा निघाला.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना कायम सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी आज उमेदच्या महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या हजारो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे रूपांतर ठिय्या आंदोलनामध्ये झाले. जिल्हाधिकाऱ्यांना मागणीबाबत निवेदन सादर करण्यात आले. उमेद… जिंदाबाद जिंदाबाद, आमच्या मागण्या मान्य करा, अशा घोषणा देत जिल्हा परिषदेतून हा मोर्चा निघाला. त्यानंतर मनोरुग्णालय, जिल्हा रुग्णालयामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रियतेने काम सुरू आहे. अभियानाच्या माध्यमातून तब्बल ३ हजार अधिकारी व कर्मचारी मागील १० वर्षांपासून कंत्राटी स्वरूपाचे काम करत आहेत. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन वर्षापासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासनदरबारी वेळोवेळी मागण्या करण्यात आल्या; परंतु मागणी मान्य न केल्यामुळे १० ते १२ जुलै २०२४ दरम्यान मुंबईत आंदोलन करण्यात आले.

 सद्यःस्थितीमध्ये राज्यात सुमारे ८४ लाख कुटुंबे या अभियानामध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ९० टक्के महिलांचा सहभाग अभियानामध्ये आहे. त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये विकसित भारत करण्याची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी उमेद अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग होणे आवश्यक आहे म्हणून कर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी अधिकारी- कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील शिर्के व कॅडर संघटनेच्या अध्यक्षा रूपाली नाकाडे आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

आश्वासनाची पूर्तता नाही – मुंबईतील आंदोलनावेळी मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र तब्बल अडीच महिने होऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला, कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २५ सप्टेंबर २०२४ पासून गावस्तरापासून ते राज्यस्तरावर पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता.

RELATED ARTICLES

Most Popular