पावसाच्या जोरदार सरींसोबत आलेल्या चक्रीवादळाचा तडाखा बसून तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील साखरीनाटे आणि नाटे यथे घरांची पडझड झाली असून गुरुवारी (ता. ६) पुन्हा एकदा देवाचेगोठणे येथे चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले आहे. त्यामध्ये देवाचेगोठण राघववाडी येथील समीर तिर्लोटकर आणि भगवान तिर्लोटकर यांच्या घरावर झाड पडून छप्पर तुटून घराच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. घरावर झाड पडले तेव्हा सुदैवाने घरामध्ये कोणीही- माणसे नव्हती अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. गेले दहा दिवस तालुक्यात संततधार सुरू आहे. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचे संकेत दिल्याप्रमाणे आज दिवसभर सातत्याने पडणाऱ्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसाबरोबर जोरदार वारेही सुटले आहेत.
दोन दिवसांपूर्वी चक्रीवादळाचा तडाखा बसून तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील साखरीनाटे आणि नाटे येथे घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा हा तडाखा कालही तालुक्यामध्ये कायम राहिला होता देवाचेगोठणे राघववाडी येथील तिर्लोटकर यांच्या घरावर सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास झाड पडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये भगवान तिर्लोटकर यांच्या घराच्या छप्पराच्या पत्र्यांचे नुकसान होताना भिंतीला तडे गेले आहेत. काही ठिकाणी भिंत ढासळली असून, कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहे. समीर तिर्लोटकर यांच्याही घराच्या छप्पराच्या पत्र्यांचे नुकसान होताना भिंतीला तडे गेले आहेत. आपद्ग्रस्त तिर्लोटकर यांच्या घरातील माणसे कामानिमित्ताने बाहेर गेलेली असल्याने घरावर झाड पडले तेव्हा घरामध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितह झालेली नाही.
या नुकसानीची राज तालुका कुणबी पतपेढीचे संचालक अविनाश नवाळे, ग्रामसेवक राऊत यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महसूल प्रशासनाशी संपर्क सा नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचनाही त्यांनी या वेळी केली. त्यानुसार पंचनामा करण्याचे काम सुरू होते. माडबन येथे गंगाराम गवाणकर यांचे आंबा कलम पडून नुकसान झाले, तर साखरीनाटे परिसरात दरड कोसळून कोंबडीपालन शेड जमिनदोस्त होऊन कोंबड्यांचे नुकसान झाले. नाटे येथील जाबीर गडकरी यांचे घर जमिनदोस्त झाले आहे. तुळसवडे यथील शोभा पळसमकर यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. साखरीनाटे, तुळसवडे परिसरात घर व झाडांची पडझड होऊन झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार शीतल जाधव यांनी दिल्या आहेत.